घरमनोरंजनसुपरस्टार सिंगर 3 मध्ये संगीतकार श्रेयस पुराणिक क्षितिजच्या परफॉर्मन्सने इंप्रेस

सुपरस्टार सिंगर 3 मध्ये संगीतकार श्रेयस पुराणिक क्षितिजच्या परफॉर्मन्सने इंप्रेस

Subscribe

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लहान मुलांचा गायन रियालिटी शो ‘सुपरस्टार सिंगर 3’ हा या वाहिनीचा स्वतः चा फॉरमॅट आहे. तिसऱ्या सीझनमध्ये आलेल्या मुलांनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या छोट्या उस्तदांमध्ये ‘संगीत के नए हुनर, जो बनेंगे कल के धरोहर’ शोधणारा हा सीझन भारतीय संगीताचा वारसा नक्कीच अधिक समृद्ध करेल. लहान मुलांसोबत या प्रवासात असणार आहे ‘सुपर जज’च्या रूपात देशातील पॉप गायिका नेहा कक्कड. तर, प्रसिद्ध युवा गायक सलमान अली, पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, मोहम्मद दानिश आणि सायली कांबळे कॅप्टनच्या भूमिकेत दिसतील आणि स्पर्धकांना आपले सांगीतिक ज्ञान देऊन त्यांचा सांगीतिक प्रवास समृद्ध करतील. आणि आपल्या मजेशीर आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाने शो मध्ये धमाल उडवेल होस्ट हर्ष लिंबाचिया.

या वीकएंडला ‘फायनल ऑडिशन्स’ मध्ये सगळे स्पर्धक उत्तमोत्तम परफॉर्मन्स देऊन टॉप 15 मध्ये आपले स्थान नक्की करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतील. या भागात यूपीच्या पिलिभीतहून आलेल्या 13 वर्षीय क्षितिज सक्सेनाने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील ‘तुम क्या मिले’ गीत सादर करून आपला ठसा उमटवला. याबद्दल क्षितिजला सगळ्यांकडून स्टँडिंग ओव्हेशन तर मिळालेच पण नेहा कक्कडने तर त्याला दाद देताना म्हटले, “तू जन्मजात गायक आहेस. तुझा परफॉर्मन्स आम्हा सगळ्यांना खूपच आवडला आहे आणि मला वाटते, माझ्यासकट संगळ्यांवर तू आपला प्रभाव टाकला आहेस.”

- Advertisement -

 

‘सतरंगा’ गीताचा संगीतकार श्रेयस पुराणिक प्रारंभिक ऑडिशनमध्ये क्षितिजच्या परफॉर्मन्सने इतका प्रभावित झाला होता की, फायनल ऑडिशनमध्ये त्याला सपोर्ट करण्यासाठी तो उपस्थित राहिला होता. तो म्हणाला, “क्षितिज, सुरुवातीच्या फेरीत ‘सतरंगा’ हे गीत तू इतके अप्रतिम सादर केले होतेस की, तुला भेटायला मी उत्सुक होतो. हे गाणे ऐकताना खूप सोपे वाटते पण ते गाताना लक्षात येते की ते तसे कठीण आहे. तू मात्र अत्यंत सहजतेने हे गीत गायलास आणि सुंदर गायलास! तुझी गायकी मला आवडली, ते गाणे तुझ्याकडून ऐकताना खूपच मजा आली. या गाण्याचे शेवटचे कडवे मला तुझ्यासोबत गायला आवडेल.” श्रेयसने क्षितिजसोबत मंचावर येऊन त्याच्या समवेत ‘सतरंगा’ गीत सादर केले आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केले, जो क्षितिजसाठी एक अविस्मरणीय क्षण होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -