घरताज्या घडामोडीUddhav Thackeray : हे तीनपाट आम्हाला काय रसगुल्ले देतात का? उद्धव ठाकरेंची...

Uddhav Thackeray : हे तीनपाट आम्हाला काय रसगुल्ले देतात का? उद्धव ठाकरेंची राणे कुटुंबावर टीका

Subscribe

मोदी म्हणाले होते की ते रोज दोन-तीन किलो शिव्या खातात, मग त्यांचे हे तीनपाट आम्हाला काय रसगुल्ले देतात का? असा सवाल विचारत शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राणे कुटुंबावर टीका केली. उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून नुकताच गुहागरमध्ये त्यांची सभा झाली.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते की ते रोज दोन-तीन किलो शिव्या खातात, मग त्यांचे हे तीनपाट आम्हाला काय रसगुल्ले देतात का? असा सवाल विचारत शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राणे कुटुंबावर टीका केली. उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून नुकताच गुहागरमध्ये त्यांची सभा झाली. यासभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. (uddhav thackeray slams bjp leader narayan rane in ratnagiri)

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते की ते रोज तीन किलो शिव्या खातात. मग मला त्यांना विचारायचं आहे की तुमची भोकं पडलेली तीनपाटं आम्हाला काहीही बोलतायत, ते काय रसगुल्ले आहेत का? ते बेलगाम बोलतात. आमच्यासोबत आमच्या कुटुंबाबद्दल खालच्या स्तरावर बोलतात”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राणे कुटुंबावर टीका केली.

- Advertisement -

“आम्ही खरे हिंदू आहोत. विदर्भात आपली लाट असून मोदी सरकारची वाट लागणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्ष, तर आताचा भाडोत्री जनता पक्ष किंवा भाडखाउ जनता पक्ष आहे. भाजपने भ्रष्टाचारी अभय योजना काढली, ही मोदी गॅरंटी आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“भाजपने 2024 साली म्हटलं की आम्ही देशाला विकसित करू, आताही तेच म्हणतात. मग गेली दहा वर्षे काय गवत उगवत बसला होता का? मासेमारी करायला गुजरातच्या एलईडी बोटी येत आहे. सगळंच गुजरातला नेत आहेत. मला गुजरातबद्दल राग नाही. गुजराती बांधवांच्या मदतीसाठीदेखील शिवसैनिक धावून जातो. निसर्ग आणि तोक्ते वादळात मोदी इकडे फिरकले नाहीत. केंद्राने देखील मदत केली नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – UDDHAV THACKERAY : आमच्या हिंदुत्वात ओव्या पण तुमच्या हिंदुत्वात शिव्या; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -