घरमनोरंजनबिग बींच्या नातीचं ग्लॅमरस फोटोशूट!

बिग बींच्या नातीचं ग्लॅमरस फोटोशूट!

Subscribe

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तिची आई- श्वेता नंदा हिच्याप्रमाणेच ग्लॅमर वर्ल्डपासून बराच काळ दूर होती.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, हिने काही दिवसांपूर्वीच अभिनयाच्या क्षेत्रात तिचा डेब्यू केला. कल्याण ज्वेलर्सच्या एका जाहिरातीमध्ये श्वेताने बिग बींसोबतच अभिनय केला होता. त्यावेळी श्वेता नंदा चांगलीच चर्चेत आली होती. आता त्यापाठोपाठ सध्या चर्चेत आली आहे अमिताभ बच्चन यांची नात ‘नव्या नवेली नंदा‘. नव्या नवेली ही श्वेता नंदनची मुलगी आहे. नुकतंच नवेली नंदाने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं असून, श्वेताने या फोटोशूटमधील काही निवडक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोशूटच्यावेळेचे नवेलीचे हे खास फोटोज सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. बिग बींनीही ट्वीटरवरुन आपल्या नातीचा अर्थात नवेली नंदाचा फोटो शेअर करत तिचे कौतुक केले आहे. उपलब्ध माहितीनुसार ‘नव्या नवेली नंदा’ हिने हे फोटोशूट एका कपड्यांच्या ब्रँडसाठी केलं आहे. विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये नव्या नवेलीसोबत तिची आई श्वेता नंदाही झळकली आहे.

navya naveli nanda
फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम

नव्या नवेली आणि श्वेता नंदाचं फोटोशूट :

नव्या नवेली आणि श्वेताच्या ग्लॅमरस अदा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -