घरमुंबईम्हाडाच्या लॉटरीसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण; २५ ऑगस्टला सोडत

म्हाडाच्या लॉटरीसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण; २५ ऑगस्टला सोडत

Subscribe

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९०१८ घरांसाठीच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया संपली असून या घरांसाठी एकूण ५५ हजार २५६ अर्ज आले आहेत. म्हाडाची ९०१८ घरांसाठीची सोडत २५ ऑगस्टला आहे.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९०१८ घरांसाठीच्या लॉटरीसाठी आता अर्ज नोंदणीची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन तसेच एनईएफटी माध्यमातून अर्जासाठीची मुदत १८ ऑगस्टला रात्री संपली. या घरांसाठी एकूण ५५ हजार २५६ अर्ज आले आहेत. म्हाडाच्या कोकण परिमंडळाच्या घरांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त लोकप्रतिसाद लाभला आहे. लोक आग्रहामुळेच म्हाडाने यंदाच्या लॉटरी प्रक्रियेला दहा दिवसांची मुदतवाढ दिली होती. म्हाडाला एनईएफटी माध्यमातून आणखी अर्जासाठीची अनामत रक्कम मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा अर्जदारांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सोडत

सोडतीसाठी स्विकृत अर्जाची पहिली (कच्ची) यादी २२ ऑगस्टला म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर होईल. तर स्विकृत अंतिम अर्जांची यादी २३ ऑगस्टला प्रसिद्ध होईल. म्हाडाची ९०१८ घरांसाठीची सोडत २५ ऑगस्टला आहे. सकाळी १० वाजता ही ऑनलाईन सोडत प्रक्रिया सुरू होईल. सोडतीमधील यशस्वी आणि प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर २५ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता जाहीर करण्यात येईल.

- Advertisement -

यंदा लॉटरी म्हाडाच्या इमारतीत

वांद्रे रंगशारदा याठिकाणी लॉटरी निघणार आहे. दहा वर्षापूर्वी म्हाडाची लॉटरी म्हाडाच्या मुख्यालयात निघायची, पण कालांतराने लॉटरीसाठी हजेरी लावणाऱ्यांची संख्या पाहता म्हाडाने रंगशारदा येथे सोडत प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. यंदा मात्र लॉटरी सोडत प्रक्रिया ही मुख्यालयात पार पडणार आहे. प्रत्यक्ष सोडतीसाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येत आता घट झाली आहे. अनेक लोक आता लॉटरीची सोडत ऑनलाईनच पाहतात असे म्हाडाच्या लक्षात आले आहे. प्रत्यक्ष लॉटरीच्या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या रोडावल्यानेच म्हाडाने पुन्हा आपल्याच मुख्यालयात लॉटरी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय यंदा घेतला आहे. यापूर्वीची म्हाडा मुख्यालयातील लॉटरी प्रक्रिया ही दोन दिवस चालायची अशी आठवणही म्हाडामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितली. पण आता ऑनलाईन ब्रॉडकास्टिंगमुळे मोठ्या प्रमाणावर अर्जदार हे लॉटरी ऑनलाईन पाहणेच पसंत करतात असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -