घरमनोरंजनसोनम कपूरचा ट्विटरला बाय बाय

सोनम कपूरचा ट्विटरला बाय बाय

Subscribe

बॉलिवूड स्टार्स सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात. इंडस्ट्रीत ग्लॅमरच्या जगात टिकण्यासाठी, त्याच्या कामाची प्रसिद्ध करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करतात. सोनम कपूरही सोशल मीडियावर अशीच अ‍ॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री. पण आता सोनम कपूर ट्विटरवर दिसणार नाही. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने सोशल वेबसाईट ट्विटरला बाय बाय केलाय.

मी काही काळासाठी ट्विटरपासून दूर जातेय. हे खूपच नकारात्मक होत चाललंय. सर्वांना शांती आणि प्रेम… अशा आशयाचे ट्विट करत सोनमने तिचे ट्विटर अकाऊंट बंद केले.सोनमने नेमके कारण सांगितले नसले तरी ती आता अनिश्चित काळासाठी ट्विटरवरून दूर गेल्याचं तिनं म्हटलंय. नकारात्मक प्रतिक्रियांना कंटाळून सोनमनं हा निर्णय घेतल्याचं बोलल जातंय. ट्विटरवर गेल्या काही दिवसांपासून सोनमला वेगवेगल्या मुद्यांवरून ट्रोल करण्यात येत होतं, त्यामुळे तिच्या या अचानकपणे निर्णय घेण्यामागे हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. कारण नुकतेच एका ट्विटर युझरनं सोनमला मुंबईच्या प्रदूषणावरून टीका करण्याऐवजी सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्याचा सल्ला दिला होता.

- Advertisement -

ट्विटर सोडण्याच्या निर्णयापूर्वी सोनमने मुंबईतील खराब रस्त्यांवर आणि वाढत्या प्रदूषणावर पोस्ट टाकली होती. या पोस्टवरून तिच्यात आणि एका ट्विटर युजरमध्ये चांगलीचं जुंपली होती. यानंतर सोनमने ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे तिने ट्विटर सोडताना केलेल्या ट्विट वरूनही सोनम प्रचंड ट्रोल झाली. ‘बहन, कभी वापस आना ही मत…’ अशा शब्दांत युजर्सनी सोनमला ट्रोल केले. ‘बहन हम तुम्हे जरा भी मिस नहीं करेंगे, मौका मिले तो होली दीपावली में आते रहना,’असे युजरने लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -