घरताज्या घडामोडीSpider Man No Way Home: प्रेक्षकांची क्रेझ पाहून थिएटर्सनी बदलली शोची वेळ,...

Spider Man No Way Home: प्रेक्षकांची क्रेझ पाहून थिएटर्सनी बदलली शोची वेळ, तिकिटाची किंमत तर पहा

Subscribe

मार्वेल स्टूडिओचा ‘स्पाइडर मॅन नो वे होम’ हा सिनेमा १६ डिसेंबरला रिलीज होत आहे. हॉलिवूडमध्ये हा सिनेमा अमेरिकेसह संपूर्ण जगात १७ डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. काही दिवासांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. तेव्हापासून भारतातही या सिनेमाची प्रचंड क्रेझ पहायला मिळत आहे. भारतीय प्रेक्षक देखील हा सिनेमा पाहण्यासाठी आतूर आहे. भारतातील अनेक थिएटर्समध्ये सिनेमाचे आगाऊ बुकींग देखील करण्यात आली आहेत. याच संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे सिनेमाविषयी प्रेक्षकांची क्रेझ पाहून थिएटर्स मालक देखील हैराण झाले आहेत. अनेक थिएटर्सनी त्यांच्या वेळा बदलल्या आहेत. मुंबईतील अनेक थिएटर्समध्ये स्पाइडर मॅन नो वे होम हा सिनेमाचे शोज सकाळी ४ वाजल्यापासून सुरू करण्यात आले आहेत. सिनेमाचे पहिले स्क्रिनिंग हे सकाळी ४:१५ वाजता आहे.

ठाण्यात सकाळी ५ वाजता पहिला शो

मुंबईसह ठाण्यातील अनेक थिएटर्समध्ये या सिनेमाचा पहिला शो सकाळी ५ वाजता लावण्यात आला आहे. सकाळच्या शो साठी देखील प्रेक्षक आगाऊ बुकींग करत असल्याची माहित समोर आली आहे. प्रेक्षकांची सिनेमासाठीची क्रेझ पाहून थिएटर्सनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या सिनेमासाठी दिड लाखांहून आगाऊ बुकींग झाले आहे.

- Advertisement -

सिनेमाचे तिकिट इतक्या रुपयांना 

तरुण आदर्श याने ट्विटर केलेल्या पोस्टमध्ये सिनेमाच्या तिकिटीबाबत माहिती दिलीय, स्पाइडर मॅन नो वे होम सिनेमाचे तिकीट बावीसशे रुपयांना विकले जात असल्याचे सांगितले. सिनेमाचे अडवान्स शो देखील हाऊसफुल झाले आहे. मनोरंजन करण्यासाठी मुंबईकरांनी आपले खिसे खाली केल्याचे तरुण आदर्शने म्हटले आहे.


हेही वाचा – अनुराग कश्यपच्या नव्या सिनेमात कृति सेनन दिसणार मुख्य भूमिकेत

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -