घरमनोरंजनसुबोध आणि श्रृतीचा 'हा' रोमँटिक अंदाज तुम्ही बघितलात का?

सुबोध आणि श्रृतीचा ‘हा’ रोमँटिक अंदाज तुम्ही बघितलात का?

Subscribe

‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटातून लग्नाची धम्माल, मस्ती-मज्जा अनुभवता येणार आहे. या सिनेमाचं नुकतंच सोशल नेटवर्किंग साईटवर एक रोमँटिक गाणं लाँच करण्यात आलं आहे.

१२ ऑक्टोबरच्या मुहूर्तावर ‘शुभ लग्न सावधान’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रृती मराठे अनेक वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचे नुकतेच सोशल नेटवर्किंग साईटवर रोमँटिक गाणं लाँच करण्यात आलं आहे.

‘हे वेड आहेस तू’ असे या गाण्याचे बोल आहेत. सुबोध आणि श्रुतीची केमिस्ट्री या गाण्यातून दिसत आहे. तसेच, या गाण्यात दुबईचे बुर्ज अल अरब हे सप्ततारांकित हॉटेलही आपल्याला दिसत आहे. हे लव्हेबल गाणं गीतकार मंदार चोळकर यांनी लिहिलं आहे. तर चिनार आणि महेश यांनी संगीतबद्ध केलं आहे.

- Advertisement -

हिंदी चित्रपटात कायमच आपण लग्नसमारंभ मोठ्या दणक्यात साजरा करताना बघतो. ‘हम आपके है कौन’, ’हम साथ साथ है’ हे हिंदी चित्रपट तुफान गाजले. आता या हिट चित्रपटांसारखी कथा प्रेक्षकांना मराठीत देखील बघता येणार आहे. आगामी ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटातून हीच लग्नाची धम्माल, मस्ती-मज्जा अनुभवता येणार आहे.

हे कलाकार असणार लग्नात हजर!

या सिनेमात सुबोध भावे, श्रृती मराठेबरोबर डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये यांचीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. लगीनघाईवर आधारीत असलेल्या या संपूर्ण सिनेमात मराठमोळ्या लग्नाच्या सनई चौघडयांचा नाद रसिकांना अनुभवता येणार आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. ‘बंध नायलॉन’चे या चित्रपटानंतर तब्बल दोन वर्षांनंतर हे दोघे एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं शुटिंग दुबई आणि इगतपुरीमध्ये करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -