घरदेश-विदेशमाणुसकीला काळीमा! ६० वर्षीय महिलेवर गोळीबार; शेजाऱ्यांनी केला व्हिडीओ

माणुसकीला काळीमा! ६० वर्षीय महिलेवर गोळीबार; शेजाऱ्यांनी केला व्हिडीओ

Subscribe

शेजाऱ्याने महिलेचा बचाव करण्याऐवजी ती तडफडत असताना तिचा व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील कासगंज या भागातून एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ६० वर्षाच्या महिलेला जवळून एकदा नाही तर दोनदा गोळी घालतो. माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट म्हणजे या महिलेला गोळी घालतानाचा व्हिडीओ शेजाऱ्यानेच काढला आहे. यावेळी शेजाऱ्याने महिलेचा बचाव करण्याऐवजी ती तडफडत असताना तिचा व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महिला मदत मिळवण्यासाठी तडफडताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारच्यांच्या घरातून हा व्हिडीओ तयार केल्याचे दिसत आहे. या घटनेत एक व्यक्ती बंदुकीच्या सहाय्याने या महिलेला धमकावत असून तिच्यावर बंदूक रोखून धरली आहे. यावेळी महिला त्या व्यक्तीच्या तावडीतून पळ काढत आपल्या घराच्या दिशेने जाते. मात्र या व्यक्तीने महिलेवर मागच्या बाजूने गोळीबार केल्याने ही महिला जागीच कोसळते. गोळी लागल्याने ही महिला तडफडत मरत असताना शेजारच्यांनी तिचा हा धक्कादायक व्हिडीओ तयार केला. दरम्यान या घडणाऱ्य़ा घटनेत महिलेवर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला कोणीच अडवण्याचा प्रयत्न करत नसल्याने त्या व्यक्तीने पुन्हा महिलेवर दुसऱ्यांदा गोळी चालवल्याचे समजते आहे.

- Advertisement -

गोळीबार करणाऱ्या आरोपी मोनूला ताब्यात घेण्यात आले असून त्याने महिलेवर का गोळीबार केला, हे अद्याप कळू शकले नाही. आरोपीला मदत करणार्‍या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. तसेच, ज्याने व्हिडीओ बनविला त्या व्यक्तीविरोधात देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.


बायको अडकली माहेरी, नवऱ्याने प्रेयसीलाच लग्न करून आणलं घरी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -