घरमनोरंजनसुहानाचा 'हा' लूक चाहत्यांना आवडला; फोटो होतोय व्हायरल

सुहानाचा ‘हा’ लूक चाहत्यांना आवडला; फोटो होतोय व्हायरल

Subscribe

सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत असलेल्या शाहरूखच्या मुलीचा पारंपारिक लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलेही त्यांच्याप्रमाणेच समाज माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. यामध्ये बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरूख खानची लेक नेहमीच अव्वल ठरते. सध्या सुहाना लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. असे असताना तिचा लंडनमधील भारतीय वेशातील पारंपारिक लूक सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
सुहाना खान तिच्या फॅशन सेन्स आणि लूक्समुळे नेहमीच चर्चेत राहते. चित्रपटसृष्टीपासून दोन हात लांब राहणारी सुहाना स्टार किड्सच्या चर्चांमध्ये नेहमी अव्वल ठरते.

सलवार कमिज आणि लाइट मेकअप

यावेळी सुहाना लंडनमधील तिच्या भारतीय पारंपारिक वेशातील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोंनुसार सुहाना लंडनमधील एका लग्नसमारंभात भारतीय पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. शाहरूख खानची लेक सुहाना लग्नसमारंभातील मेहंदी सोहळ्यात दिसून आली. यावेळी तिने फिकट रंगाचा सलवार कमिज घातला असून तिच्या हातावर मेहेंदी सुद्धा दिसत आहे. सुहानाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करताच, हे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये सुहाना आपल्या चुलत भावंडांबरोबर दिसत असून सुहानाने खूपच लाइट मेकअप केल्याचेही दिसून येते.

View this post on Instagram

Suee's Squad ? #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS?) (@suhanakha2) on

- Advertisement -

गौरी खानही दिसतेय सुंदर

याशिवाय सुहानाचा लग्नसोहळ्यातील आणखीन एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये सुहानाने साडी नेसली असून आपल्या चुलत भावंडांबरोबर सुहाना खूप सुंदर दिसत आहे. यावेळी सुहानासोबत तिची आई गौरी खानही उपस्थित होती. गौरी खानही फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

Shaadi hai … bride was the best dancer ❤️

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -