घरमहाराष्ट्र'पालखी मुक्काम ठिकाणी मांसविक्री, दारु दुकानांवर बंदी'

‘पालखी मुक्काम ठिकाणी मांसविक्री, दारु दुकानांवर बंदी’

Subscribe

पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी आणि पालखी मार्गावर दारूदुकाने मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री बंद ठेवण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून वारीच्या तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यामध्ये पालखी सोहळ्याच्या कालावधीमध्ये वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा प्राधान्याने देण्यात येतात. याची तयारी आताच केली जात आहे. तसंच यावेळी पुण्याच्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वारी काळामध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी आणि पालखी मार्गावर दारूदुकाने मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री बंद ठेवण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक

येत्या २५ जून २०१९ रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे, तर २४ जून २०१९ रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या काळात पुण्यात अनेक वारकरी येत असतात. मात्र यंदाच्या वारी कालावधीमध्ये पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी आणि मार्गावर दारू, मांस आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पालखी सोहळ्याच्या प्रशासकीय तयारीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

- Advertisement -

बैठकीत दिलेले आदेश

पुणे जिल्ह्यातील पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखीमार्गावर मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, कत्तलखाने आणि दारूची दुकाने बंद ठेवावीत, या सोहळ्यामध्ये सामील असणाऱ्या वाहनांची तपासणी करणे आणि त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देणे, वाहतुकीचे नियोजन, सुरळीत विद्युत व्यवस्था या बाबींवर देखील चर्चा झाली. त्याचबरोबर वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, शासकीय दरामध्ये रॉकेल, धान्य, अखंडित वीज पुरवठा करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले. पालखी सोहळ्याच्या प्रशासकीय तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलालवी यावेळी हे आदेश देण्यात आले.

पाणी पुरवठ्याचे होणार नियोजन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या काळात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी, पालखी तळांवरील खड्डे मुरुम भराई करून व्यवस्थित करणे, आवश्यक त्या ठिकाणी रोलिंग करणे, पालखीतळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुकानदारांकडून होणाऱ्या अतिक्रमणांबाबत तसेच पालखीमध्ये सामील वाहनांच्या पाार्किंगबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देखील करण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -