Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन Sulochana Didi........ आणि त्यानंतर सुलोचना दीदींनी डान्स कधीच केला नाही

Sulochana Didi…….. आणि त्यानंतर सुलोचना दीदींनी डान्स कधीच केला नाही

Subscribe

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने प्रकक्षकांच्या मनात ठसा उठवणार्या सुलोचना दीदींची निधन झाले आहे. सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवास तब्बल सात दशकांचा आहे. सुलोचना दीदींनी त्यांच्या अभिनयाचा प्रवास हा एक बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. मराठीच नव्हे, तर हिंदी व दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. सुलोचना दीदींनी अभिनेता धर्मेंद्र, अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेता दिलीप कुमार, अभिनेता देव आनंद अशा मोठ्या-मोठ्या सुपरस्टार्सच्या आईच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण बऱ्याचदा पाहिले आहे.

सुलोचना लाटकर यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खडकलाट गावामध्ये झाला होता. सुलोचना दीदींचे लाटकर हे आडनाव देखील खडकलाट या गावाच्या नावावरून ओळखले जाते. हे खडकलाट गाव महाराष्ट्राच्या सीमेलगतच आहे. त्यामुळे सुलोचना बाईंचे वडील महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानांमध्ये दरोगा म्हणून काम करत होते. सुलोचना बाईंचे प्राथमिक शिक्षण गावातल्याच एका प्राथमिक शाळेमध्ये झाले. पण, सुलोचना दीदींना शिक्षणाची काही खास आवड नव्हती. त्यांच्या गावातील दर्ग्यांमध्ये दरवर्षी उरूस भरायचा. त्यावेळी भरणाऱ्या जत्रेमध्ये तमाशा, नाटक तसेच चित्रपटांचे खेळ व्हायचे. छोटी सुलोचना आवडीने पहिल्या रांगेमध्ये बसून या नाटक- सिनेमांचा आस्वाद घ्यायची. असे म्हटले जाते की, छोटी सुलोचना पडद्यावरील धावणारी दृश्य पाहून, उत्सुकतेपोटी सिनेमाच्या पडद्यामागे काय चालले हे पाहायला जायची. पुढे हेच तिचे विश्व असेल याची त्यावेळी तिला जाणीवही नव्हती.

- Advertisement -

‘या’मुळे दीदींनी चित्रपटात डान्स केला नाही  

सुलोचना दीदींनी भाऊबीज चित्रपटानंतर कोणत्याच चित्रपटात नृत्य केले नाही. यासंदर्भात दीदींनी एका मुलाखतीदरम्यान किस्सा सांगितला की, “एका-दोन समारंभात गेले असताना त्यांना काही लोकांनी विचारले की, तुम्हाला डान्स करता येतो का?, तेव्हा मी त्यांना म्हटले की, डान्स शिकले म्हणून करते. तेव्हा काही लोक म्हणाली, तुमचा डास पाहून आमच्या घरातील पोरीबाळी देखील डान्स करायला लागतील. आमच्या मुली स्टेजवर उभ्या राहिल्यातील कसे चालेल?, हे ऐकून मला वाईट वाटले, यानंतर मी डान्स करणे सोडले.”

दीदींना असे मिळाले सुलोचना नाव 

- Advertisement -

सुलोचना दीदींचे दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे गुरू होते. भालजी पेंढारकरांनी सुलोचना दीदींना अभिनय शिकल्या. सुलोचना दीदी या भाजलींना बाबा म्हणायच्या. सुलोचना दीदींचे मूळ नाव हे रंग असे होते. परंतु, जयप्रभा स्टुडिओत काम करण्यासाठी आल्यानंतर भालजी पेंढारकरांनी भावपूर्ण डोळे पासून त्यांना ‘सुलोचना’ असे नाव दिले आणि पुढे जाऊन चित्रपटसृष्टीत त्यांचे हेच नाव रूढ झाले.

- Advertisment -