घरमनोरंजन'भारत'मध्ये प्रियांकाऐवजी लागणार नॅन्सीची वर्णी

‘भारत’मध्ये प्रियांकाऐवजी लागणार नॅन्सीची वर्णी

Subscribe

नॅन्सी म्हणजे दुसरं - तिसरं कुणी नसून कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आहे. आपल्या नेहमीच्या अंदाजात सुनीलनं ही ऑडिशन दिली आहे.

इंटरनॅशनल आणि बॉलीवूड सेन्सेशन प्रियांका चोप्रानं सलमान खानबरोबरचा ‘भारत’ चित्रपट सोडला आहे. याबाबत दिग्दर्शक अली अब्बास जाफरनं ट्विट करून माहिती दिली होती. आता प्रियांकाच्या जागी नक्की कोणती अभिनेत्री येणार? हा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. या भूमिकेसाठी नॅन्सीनं ऑडिशन दिली असून आता तिची प्रमुख अभिनेत्री म्हणून वर्णी लागणार का? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. आता तुम्हाला कळत नसेल ही नॅन्सी कोण? तर नॅन्सीनं दिलेल्या ऑडिशनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ही नॅन्सी म्हणजे दुसरं – तिसरं कुणी नसून कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आहे. आपल्या नेहमीच्या अंदाजात सुनीलनं ही ऑडिशन दिली आहे.

सलमान आणि अली यांच्याकडे केली विचारणा

सुनील ग्रोव्हरनं वेशभूषा बदलून नॅन्सीच्या वेषात सलमान खान आणि अली अब्बास जाफर यांच्याकडून प्रमुख भूमिकेसाठी विचारणा केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ सुनीलनं शेअर केला आहे. या व्हिडिओत नॅन्सीच्या वेषात सुनील ऑडिशन देताना दिसत आहे. विचित्र हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा मजेशीर व्हिडिओ सुनीलनं केला आहे. ‘भारत’साठी आता नव्या अभिनेत्रीची गरज असून या भूमिकेला न्याय देण्यासाठी आपणच योग्य असल्याचं या व्हिडिओमध्ये नॅन्सीनं म्हटलं आहे. सुनीलचा हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून लोकांना खूपच आवडत आहे. सलमान खान आणि प्रियांका या चित्रपटातून १० वर्षांनी एकत्र येणार होते. पण आता प्रियांकानं हा प्रोजेक्ट सोडला आहे.

- Advertisement -

प्रियांकानं सोडला चित्रपट

चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जाफर यानं प्रियांका एका विशेष कारणानं हा चित्रपट सोडत असल्याचं ट्विट केलं होतं. त्यामुळं प्रियांकानं निक जोन्सबरोबर साखरपुडा केल्याच्या बातम्यांना उधाण आलं. पण अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा प्रियांका अथवा निककडून करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -