घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवणार - मुख्यमंत्री

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवणार – मुख्यमंत्री

Subscribe

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोर्टात भक्कमपणे बाजू मांडायला हवी यावर सर्व पक्षीय नेत्यांचे एकमत झाले असून मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे.

मराठा आरक्षणासंबंधी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विधानभवन, मुंबई येथे संपन्न झाली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मागासवर्ग आयोगाला वैधानिक दर्जा आहे. आयोगाची सुनावणी जवळपास संपत आलेली आहे. आयोगाने लवकरात लवकर अहवाल द्यावा, अशी विनंती आम्ही आयोगाला केलेली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

आज सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत विरोधकांनी अनेक सूचना मांडल्या. त्या सर्व सूचनांचा ठराव आयोगाकडे पाठवला जाणार आहे. अहवाल प्राप्त होताच विशेष अधिवेशन बोलावून त्यावर चर्चा केली जाणार आहे. न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा टिकला पाहीजे यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहीजेत यावर सर्व पक्षाचे एकमत झाले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

Special assembly session will take for Maratha Reservation – CM

मराठा आरक्षणासंबंधी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विधानभवन, मुंबई येथे संपन्न झाली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

Posted by My Mahanagar on Saturday, 28 July 2018

 

- Advertisement -

गुन्हे मागे घेण्याबाबत विचार

मराठा समाजाने पुकारलेल्या बंदमध्ये हिंसा झाली आहे. यामध्ये काही लोकांवर विनाकारण कारवाई झाली, असे म्हणणे आहे. म्हणून मी डिजीना विनंती केली आहे की, गंभीर गुन्हे सोडून इतर गुन्हे परत घ्यावे.

मेगा भरतीचा संभ्रम दूर करू

मेगा भरतीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांना आम्ही आश्वत करु इच्छितो की, मराठा समाजाचा संभ्रम दूर करुनच भरती प्रक्रिया केली जाईल. मराठा समाजासाठीच्या जागा कुणालाही देणार नाही, त्यामुळे मराठा समाजाने कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

बैठकीला उपस्थित असलेले नेते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, सभापती रामराजे नाईक निबांळकर, राष्ट्रवादीचे पक्षनेते अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आ. छगन भुजबळ, आ. शरद रणपिसे, आ. अनिल परब, आ. कपिल पाटील आणि शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते.

बैठकीतील चर्चा:-

धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेले मुद्दे..

  • आंदोलकावरील सरसकट गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत
  • मेगा भरती बाबत भूमिका स्पष्ट करावी. विभाग निहाय जागा आणि राखीव जागांचा तपशील दोन दिवसात जाहीर करावा
  • अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज अनुदान योजनेपेक्षा कर्ज अनुदान योजना जाहीर करावी.
  • आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या..
  • आरक्षणाबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा
  • मागासवर्ग आयोगाचा अहवाल एक महिन्याच्या आत घ्या, त्याआधारे १६ टक्के आरक्षण द्या आणि ते आरक्षण घटनेच्या नवव्या परिशिष्टात टाकण्यासाठी घटनादुरुस्ती करा म्हणजे ते न्यायालय रद्द करू शकणार नाही त्यासाठी विशेष अधिवेशन घ्या

अजित पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे ..

  • गंभीर प्रकरणात संयम महत्वाचा असतो , मंत्र्यांना भडकावू वक्तव्य करण्याबाबत समज द्यावी.
  • खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,
  • मराठा आरक्षणाबाबत केंद्रात जावे लागले तर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार साहेब पुढाकार घेतील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -