घरमनोरंजनमला योग्य व्यक्ती... सुष्मिता सेनने केला लग्नाबाबत खुलासा

मला योग्य व्यक्ती… सुष्मिता सेनने केला लग्नाबाबत खुलासा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सुष्मिता बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने तिची लव्ह लाईफ कधीही कोणापासून लपवून ठेवली नाही. सुष्मिता मागील बऱ्याच वर्षांपासून मॉडेल रोहमन शॉलला डेट करत होती. परंतु 2021 मध्ये, सुष्मिताने ते दोघे वेगळे झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर 2022 मध्ये सुष्मिता भारतातून पळून गेलेला उद्योजक ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपमध्ये आली होती. मात्र, त्यांच नातं देखील फार काळ टिकू शकलं नाही. अशातच, आता एका मुलाखतीमध्ये सुष्मिताला तिच्या लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले.

सुष्मिता सेन करणार लग्न?

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सुष्मिताला तिच्या लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले, यावर सुष्मिता म्हणाली की, “तुमचे आई-वडील आणि समाजाचा दबाव तुम्हाला लग्नासाठी तयार करु शकत नाही शिवाय ते लग्न करण्याचे योग्य कारण देखील नाही. माझ्या लग्नाबाबत सांगायचं झालं तर, जेव्हा मला योग्य व्यक्ती भेटेल. जो माझ्या सर्व पॅरामिटर्समध्ये बसेल, तेव्हा मी नक्कीच लग्न करेन.” असं सुष्मिता म्हणाली.

- Advertisement -

रोहमन शॉलसोबतच्या नात्यामुळे सुष्मिता चर्चेत

मागील काही वर्षांपासून महिन्यांपूर्वी सुश्मिता सेन अॅक्टर रोहमन शॉल याला डेट करत होती. तो तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. तिच्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात रोहमन दिसतो. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्याचा खुलासा खुद्ध सुश्मिता सेन हिनेच केला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हे दोघं अनेकदा एकत्र दिसतात.


हेही वाचा : कांताराच्या कथेचा अभिनेता ऋषभ शेट्टीच्या बालपणाशी आहे संबंध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -