घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: फडणवीसांना उपचाराची गरज, ते अंधाऱ्या भुईत...; राऊतांची टीका

Lok Sabha 2024: फडणवीसांना उपचाराची गरज, ते अंधाऱ्या भुईत…; राऊतांची टीका

Subscribe

फडणवीस यांना सध्या उपचाराची गरज आहे. त्यांचे उपचार जर का नागपुरात होणार नसतील, तर ठाणे किंवा मुंबईत उपचार करू, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

सांगली: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. विरोधी पक्षांकडून या विधानावरून फडणवीसांवर टीकास्त्र डागलं जात आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांवर पलटवार केला तर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. ते सांगलीत पत्रकारांशी संवाद साधत होते. (Lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis needs treatment Criticism of Sanjay Raut )

देवेंद्र फडणवीस बारामतीच्या भाषणात म्हणाले की, ही लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाही. तर ही लढाई आहे पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी. त्यांच्या या वक्तव्यावर राऊत यांनी फडणवीसांना उपचाराची गरज असल्याचं म्हटलं आहे. राज्यात केवळ पंतप्रधान मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार अशी लढत आहे. फडणवीस यांना सध्या उपचाराची गरज आहे. त्यांचे उपचार जर का नागपुरात होणार नसतील, तर ठाणे किंवा मुंबईत उपचार करू. ते सध्या अंधाऱ्या  भुईत चाचपडत आहेत, असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha 2024: कल्याणची जागा डॉ. श्रीकांत शिंदे हेच लढवणार; फडणवीसांनी केलं स्पष्ट)

कल्याणमध्ये केवळ शिवसेनाच (ठाकरे गट) (Raut on Kalyan Lok Sabha Sea)

कल्याणमध्ये महायुतीचा उमेदवार श्रीकांत शिंदे असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर प्रश्न विचारला असता, राऊत यांनी कल्याणमध्ये लढाईच नसल्याचं म्हटलं आहे. त्या जागेवर केवळ उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच, फडणवीसांनी शिंदे गटाच्या उमेदवाराची घोषणा केली, कारण ती त्यांचीच बी टीम आहे. शिंदेंना कुठे अस्तित्व आहे. ते बाळासाहेबांचा धनुष्यबाणही वाचवू शकले नाहीत. त्यांना लोकसभा निवडणुकीत यश मिळणार नाही, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.

- Advertisement -

वसुली रॅकेटचे मार्गदर्शक, किरीट सोमय्या- राऊत

राऊत म्हणाले, भाजपा वसुली रॅकेट चालवत आहे. आमच्या पक्षातील सर्व वसुली रॅकेट चालवणाऱ्या लोकांना त्यांनी भाजपात घेतलं. त्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे आणि हे वसुली रॅकेट चालवणाऱ्यांचे मार्गदर्शक हे किरीट सोमय्या आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

(हेही वाचा: Lok Sabha 2024: बारामतीबाबत फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद…; जयंत पाटलांचा पलटवार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -