घरमनोरंजननव्या पोस्टरनंतर 'आदिपुरुष'च्या पहिल्या गाण्याचा टीझर रीलीज

नव्या पोस्टरनंतर ‘आदिपुरुष’च्या पहिल्या गाण्याचा टीझर रीलीज

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन आणि सुपरस्टार प्रभास सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 16 जून रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाबाबत अनेक नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आज म्हणजेच 6 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘आदिपुरुष’ चित्रपटातील हनुमानाचे नवीन पोस्टर समोर आलं. हनुमानाचे हे नवीन पोस्टर समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, अशातच आता या पोस्टरनंतर निर्मात्यांनी हनुमान जयंतीनिमित्ताने चाहत्यांना आणखी एक भेट दिली आहे. नुकताच ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

‘आदिपुरुष’मधील पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज

कृती सेनन, प्रभास आणि सैफ अली खान यांचा बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. यापूर्वी आदिपुरुष चित्रपटातील पात्रांच्या लूकमुळे वादात सापडला होता. दरम्यान, हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर आदिपुरुष चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आदिपुरुष चित्रपटातील ‘जय श्री राम’ या गाण्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. या गाण्याचे टीझर ऐकल्यानंतर लोक ट्विटरवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आदिपुरुष चित्रपटातील नवीन गाण्याचे टीझर रिलीज करून निर्मात्यांनी चाहत्यांना दुहेरी आनंद दिला. आज रिलीज झालेल्या आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरचे ट्रोल्सही कौतुक करताना दिसत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, प्रभास आणि कृति सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट 16 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसेल तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसेल. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-2’ सारख्या चित्रपटानंतर प्रभासला या अवतारात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘आदिपुरुष’चे आणखी एक नवे पोस्टर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -