घरमनोरंजन'ब्रेकअप के बाद' अभिनेत्रीची आत्महत्या

‘ब्रेकअप के बाद’ अभिनेत्रीची आत्महत्या

Subscribe

ब्रेकअप झाल्यामुळे एका तेलगू मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.

आपल्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यामुळे एका अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. या अभिनेत्रीचे नाव नागा झांसी असे आहे. या अभिनेत्रीने एका तेलगू वाहिनीच्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तिने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे. तिचे सुर्या नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. परंतु, सुर्यासोबत ब्रेकअप झाल्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. तिचे वय फक्त २१ वर्षे होते.

ब्रेकमुळे नैराश्यात गेली होती नागा

नैराश्य आले की माणूस त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. यावेळी ती व्यक्ती नैराश्याला वैतागलेली असते. त्यामुळे ती स्वत:ला संपवण्याचाही विचार करत असते. गेल्या काही दिवसांपासून अशाच मानसिक अवस्थेतून नागा झांसी जात होती. प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यामुळे ती नैराश्यात गेली होती. कुठल्याच कामामध्ये तिचं मन लागत नसे. नागा ही ‘स्टार मा’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘पवित्र बंधन’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. सुर्यासोबत ब्रेकअप झाल्यापासून तिने मालिकेच्या सेटवर जाणेदेखील बंद केले होते.

- Advertisement -

आत्महत्येची माहिती अशी मिळाली

नागा ही आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाची रहिवाशी होती. गेल्या काही वर्षांपासून ती आपल्या मोठ्या भावासोबत हैदराबादला राहत होती. नागाच्या गावी नव्या घराच्या बांधकामाचे काम सुरु होते. त्यामुळे तिचा भाऊ गावी गेला होता. दरम्यान, नैराश्यात असलेल्या नागाने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी तिने हैदराबादला आपल्या राहत्या घरातील पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, नागाच्या आई-वडिलांनी तिला फोन केला. परंतु, नागा फोन उचलत नव्हती. याबाबत तिच्या आई-वडिलांना संशय आला. त्यांनी ताबोडतोब पोलिसांना फोन लावला. पोलिसांनी नागाचे घर गाठले आणि नागाने आत्महत्या केल्याचे उघड झाले.


हेही वाचा – ‘तुला पाहते रे’ : विक्रांत सरंजामे तर व्हिलन निघाला?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -