घरमहाराष्ट्रट्रॅक्टरच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू; जमावाने केली चालकाची हत्या

ट्रॅक्टरच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू; जमावाने केली चालकाची हत्या

Subscribe

अहमदनगरमध्ये ट्रॅक्टरने चिमुरड्याला चिरडल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने चालकाची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. ट्रॅक्टरने तीन वर्षाच्या चिमुरड्याला चिरडले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर चालकाचा मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कल गावात ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये ऊसतोड मजूराच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. सोहम मोरे असं या तीन वर्षाच्या मुलाचे नाव आहे. तर अक्षय थोरात असं ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कल गावामध्ये ऊसतोड मजूर कन्हैय्याकुमार मोरे यांचा मुलगा सोहनला भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातामध्ये सोहमचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ऊसतोड मजूरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संतप्त झालेल्या ऊसतोड मजूरांनी ट्रॅक्टर चालक अक्षय थोरातला पकडले आणि ट्रॅक्टरमधून खाली उतरवून त्याच्यावर हल्ला केला. लाठ्याकाठ्या आणि कोयत्याने अक्षयवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अभक्ष गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अक्षयचा देखील यामध्ये जागीच मृत्यू झाला. याप्रकरमी श्रीरामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. सोहम आणि अक्षय यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -