घरमनोरंजन‘तुला पाहते रे’ : विक्रांत सरंजामे तर व्हिलन निघाला?

‘तुला पाहते रे’ : विक्रांत सरंजामे तर व्हिलन निघाला?

Subscribe

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रांत सरंजामे यांच्या चांगुलपणाच्या मुखवट्याआड लपलेला विक्रांतचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

प्रत्येक मालिकेचा एक युएसपी असतो. त्यामुळे ती मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करते. त्याचप्रमाणे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेत अव्वल ठरली. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिकेत असून विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांची वय विसरायला लावणारी ही प्रेमकहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. मालिकेत नुकताच विक्रांत आणि इशाचा विवाहसोहळा पार पडला आहे. मात्र या मालिकेत काही दिवसांत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

लग्नानंतर मालिकेत एक नवा ट्विस्ट

इशा आणि विक्रांतच्या म्हणजेच ‘विकीशा’च्या लग्नाचा शाही सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. या दोघांचा विवाहसोहळा विक्रांत सरंजामे यांच्या स्टेटसला शोभेल अशा शाही पध्दतीने पार पडला. मात्र या लग्नानंतर ही मालिकेतील कथा नेमकं काय वळण घेणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. नुकताच झी मराठीने एक नवीन प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेत येणाऱ्या नव्या वळणाची झलक पाहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहून विक्रांत आणि इशाच्या चाहत्यांना धक्का बसणार आहे. कारण चांगुलपणाच्या मुखवट्याआड लपलेला विक्रांत सरंजामेंचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

असा आहे प्रोमो

या प्रोमोमध्ये विक्रांतचा खरा चेहरा पाहता येणार आहे. यामध्ये त्यांनी इशासोबत लग्न का केलं यामागचं खरं कारण विक्रांत सरंजामें सांगणार असून येत्या ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता हे कखानक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


वाचा – सुबोध भावेच्या अभिनेत्रीची ‘ही’ स्टोरी तुम्हाला माहितीये का?


- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -