उर्मिला आणि आदिनाथच्या नात्यामध्ये दुरावा……..’हे’ आहे कारण!

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांना मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी म्हणून ओळखले जाते. दोघांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली असून त्यांना एक ४ वर्षांची ‘जीजा’ नावाची मुलगी आहे. पूर्वी कोठारे कुटुंबाकडे एक गोड आणि आयडियल कुटुंब म्हणून पाहिलं जायचं. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून या सुंदर कुटुंबामध्ये काहीतरी बिनसल्यासारखे दिसत आहे. आदिनाथ आणि उर्मीलाच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही मतभेद सुरू झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार उर्मीला आणि आदिनाथमध्ये सुरू असलेल्या सततच्या वादानंतर उर्मीलाने आता कोठारे कुटुंबापासून वेगळं राहायचा निर्णय घेतला आहे. उर्मीला आता तिच्या मुलीसोबत त्याच बिल्डींगमधील दुसऱ्या घरात शिफ्ट झाली आहे. जीजाचा सांभाळ सध्या आदिनाथचे आई-वडील करत आहेत.

दोघांच्या नात्यात का आला दुरावा
सूत्रांच्या माहितीनुसार, उर्मिला आणि आदिनाथ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून काहीतरी बिनसल होतं. पण एकत्र कुटुंबामुळे आणि चित्रपटसृष्टीत मोठं नाव असल्यामुळे ते एकत्र असल्याचे दाखवत होते. पण खरंतर त्यांच्या नात्यातील मदभेदांची सुरूवात बहुचर्चित चित्रपट ‘चंद्रमुखी’च्या शूटिंग दरम्यान झाली. खरे वैचारिक मतभेद तिथुनंच सुरु झाले. घरातील वरिष्ठमंडळी दोघांनाही समजावण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार उर्मिला आदिनाथच्या घरातूनं बाहेर पडली आहे. मात्र ती सध्या त्याच बिल्डिंगमधील ‘कोठारे’ कुटुंबाच्या दुसऱ्या घरात मुलीसोबत शिफ्ट झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

अनेकदिवसांपासून आदिनाथ-उर्मिलामध्ये काहीतरी बिनसले आहे असं अनेकांना वाटत होते, याचं कारण म्हणजे, नुकत्याच काही दिवसांपूर्वी उर्मिलाचा वाढदिवस झाला मात्र तेव्हा आदिनाथने उर्मिलाला शुभेच्छा दिल्या नाहीत. इतकचं नव्हे तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘चंद्रमुखी’ चित्रपटच्या कोणत्याच प्रमोशनमध्ये उर्मिला दिसली नाही. शिवाय आता अचानक उर्मिलाने तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे तेही कोठारे व्हिजन या होम प्रॉडक्शनमधून नाही तर दुसऱ्याच प्रॉडक्शन हाऊसमधून. मात्र असं देखील म्हटले जात आहे की, आदिनाथ सध्या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून उर्मिला सध्या तिच्या नव्या मालिकेच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. यामुळे दोघांनाही एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही.याचं कारणामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

 


हेही वाचा :बॉलिवूड विरुद्ध साऊथ चित्रपट…बाप हा बापच असतो…सुनील शेट्टीचा टोला