घरमनोरंजनस्पर्धेतल्या मुलांमध्ये समज आली

स्पर्धेतल्या मुलांमध्ये समज आली

Subscribe

गाणं, नृत्य हा भारतीय प्रेक्षकांचे बहुतेक मुख्य आकर्षण दिसते आहे. कारण या संदर्भातील जे रिअ‍ॅलिटी शो आहेत, त्यांचा पसारा वर्षानुवर्षे वाढतो आहे. विशेष म्हणजे हा फक्त एकाच वाहिनीवर होणारा कार्यक्रम नाही तर भारतात जेवढ्या म्हणून वाहिन्या आहेत त्यावर हे कार्यक्रम वर्षानुवर्षे सुरू आहेत. शिवाय राज्य पातळीवर त्या त्या भाषेत होणारे कार्यक्रम हे वेगळे आहेत. काळाप्रमाणे कार्यक्रमाचे स्वरूप बदलत आहे. त्याला नवीन तांत्रिकतेचा आधार लाभत आहे. ‘पूर्वी अशा स्पर्धेतून लहान मुलांचे जे मनोबल कमी होत होते, त्यातून निराशा अधिक जाणवायला लागली होती, ती आता काही अंशी कमी झालेली आहे. लहान मुलं अशा रिअ‍ॅलिटी शोकडे स्पर्धा म्हणून पहायला लागली आहेत. तसेच, यातील यशापयशाला स्वीकारायला लागलेली आहेत’, असे प्रख्यात गायक शान याचे हे म्हणणे आहे. शानसुद्धा स्पर्धेतून आलेला गायक आहे. पुढे तो परीक्षक झाला. परीक्षकांमधील वादविवाद, मुलांमध्ये असलेली निराशा याला कंटाळून भविष्यात परीक्षक म्हणून न राहण्याचा त्याने निर्णय घेतला होता. आता मुलांची आणि पालकांची बदललेली मानसिकता लक्षात घेऊन हिंदी झी टीव्हीसाठी त्याने परीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवलेली आहे.

९ फेब्रुवारीपासून रात्री ९ वाजता सारेगमप लिटल चॅम्प्सचे सातवे पर्व सुरू होत आहे. त्याची घोषणा करण्यासाठी झी टीव्हीच्या व्यवसाय विभाग प्रमुख अपर्णा भोसले यांच्यासोबत अमाल मलिक, रिचा शर्मा, शान हे परीक्षक उपस्थित होते. रवी दुबे हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणार आहेत. स्पर्धेत जे सहभागी गायक कलाकार आहेत त्यातल्या निवडक स्पर्धकांना या व्यासपीठावर गाण्याची संधी दिली होती त्यातही एक हेतू होता. ते गायक म्हणून परिचयाचे आहेत. पण, बालवयातली त्यांच्यातील प्रगल्भता उपस्थितांच्या समोर यावी हाही त्यापाठीमागचा मुख्य हेतू होता. यातल्या एका बालगायिकेने वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत साठहून अधिक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. यात जी रोख रक्कम तिला मिळाली होती ती तिने गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केलेली आहे. दुसरा जो गायक आहे त्याने अल्प वयातच स्वत:चे शिक्षण, पालकांची जबाबदारी व गायनाची आवड जपण्यासाठी मंदिरात रोज संध्याकाळी गायन करून त्यातून मिळणार्‍या पैशावर तो आपल्या या सगळ्या जबाबदार्‍या पार पाडतो आहे. या स्पर्धकांबरोबर परीक्षकांनीही गाणी सादर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -