घरमनोरंजन'धर्मवीर मु.पो.ठाणे' चित्रपटातील 'गुरुपौर्णिमा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘धर्मवीर मु.पो.ठाणे’ चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

राजकीय क्षेत्रातील गुरू-शिष्याची आदर्श अशीच एक जोडी संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. ती जोडी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे. त्यांच्या याच गुरुभक्तीचं दर्शन 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातही होणार आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा आगामी चित्रपट येत्या १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा पार पडला. आज या चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. आपल्याकडे गुरूला फक्त ब्रह्म, विष्णू, महेश नाही तर साक्षात परब्रम्ह म्हटलं जाण्याची परंपरा आहे. महाराष्ट्राला गुरू-शिष्य परंपरेचा मोठा इतिहास आहे. सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात असे अनेक नेते होऊन गेलेत, ज्यांचे शिष्यत्व पत्करून आजही अनेकजण त्यांच्या विचारांच्या वाटेवर चालतात. राजकीय क्षेत्रातील गुरू-शिष्याची आदर्श अशीच एक जोडी संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. ती जोडी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे.

त्यांच्या याच गुरुभक्तीचं दर्शन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातही होणार आहे. ‘गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही तर शिष्याचा दिवस आहे’ असे आनंद दिघे मानायचे. या दिवशी गुरुची सेवा केली की पदरी पुण्य पडते अशी त्यांची श्रद्धा होती. आपल्या गुरूंचे चरणकमल धुण्याचा आणि पाद्यपूजा करण्याचा प्रसंग या गाण्यातून दाखवलेला आहे. आनंद दिघे यांची जी श्रद्धा बाळासाहेबांवर होती अगदी तशीच श्रद्धा एकनाथ शिंदेच्या मनात आनंद दिघे साहेबांबद्दल होती. त्यांच्या या गुरू शिष्याच्या नात्याची अनोखी गोष्ट या चित्रपटातून आणि या गाण्यातून उलगडणार आहे.

- Advertisement -

संगीता बर्वे यांचे शब्द असलेल्या या गाण्याला अविनाश-विश्वजीत यांनी संगीत दिले आहे. तर मनिष राजगिरे यांनी ते गायले आहे. या चित्रपटामधून आपल्याला आनंद दिघे यांचा करारी बाणा तर दिसणारच आहे पण त्यांच्या आत असलेला एक हळवा शिष्य, गुरुंपुढे निस्सिम श्रद्धेने, आदराने नतमस्तक होणारा शिष्य अशी त्यांची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना ‘गुरुपौर्णिमा’ या गाण्यातून बघायला मिळणार आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली आहे. या गाण्यातून प्रथमच बाळासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

झी स्टुडिओज निर्मिती आणि प्रविण तरडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनात बनलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

 

 

रामदेव बाबांच्या आश्रमात रवी राणा आणि नवनीत राणांची झाली होती पहिली भेट ! त्यानंतर सुरू झाली दोघांची लवस्टोरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -