घरमनोरंजनकोणी बिझनेसमॅन, कोणी नोकरी 'या' सेलिब्रिटींनी सोडलं अभिनयक्षेत्र

कोणी बिझनेसमॅन, कोणी नोकरी ‘या’ सेलिब्रिटींनी सोडलं अभिनयक्षेत्र

Subscribe

अभिनयाच्या माध्यमातून कलाकार कोट्यवधी रुपये कमावत असतात. इतकेच काय तर जाहिरातींमधून बक्कळ पैसे कमवतात. एकदा का इंडस्ट्रीत पाय ठेवला कलाकार सहसा मागे वाळवून पाहत नाही. मात्र, असे असताना असे अनेक सेलेब्रिटी आहेत ज्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला अलविदा करत बिझनेस क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर काही सामान्य माणसासारखे जीवन जगत आहेत.

कुमार गौरव – कुमार गौरव याने सुरुवातीला भरपूर हिट चित्रपटांमध्ये काम केलं. लव्हस्टोरी, नाम यासारख्या चित्रपटात तो झळकला होता. पण, काही वर्षानंतर त्याने पूर्णपणे इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या तो मालदीवमध्ये बांधकाम आणि ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करत आहे.

- Advertisement -

ट्विंकल खन्ना – बॉलिवूडचा दिग्गज कलाकार अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिनेही काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्राला अलविदा केला. इंडस्ट्रीत आल्यावर तिने खूप प्रयन्त केले. मात्र, सतत फ्लॉप चित्रपट आल्याने तिने अभिनयक्षेत्राला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. आता ट्विंकल इंटेरिअर डिझायनींग आणि रायटिंगमध्ये करिअर करत आहे.

आयेशा टाकिया – सलमान खानच्या ‘वाँटेड’ या चित्रपटातून आयेशा रातोरात फेमस झाली. मात्र, २०११ नंतर तिने फ्लिम इंडस्ट्रीला अलविदा केलं. करिअरमध्ये २१ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आयशाने बिझनेसमन फरहान आझमीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिला एक मुलगा असून ती तिच्या कुटुंबाबासोबत आनंदी आहे.

- Advertisement -

जत बेदी – कोई मिल गया, इंटरनॅशनल खिलाडी यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये रजत बेदी झळकला होता. मात्र, तो अभिनयक्षेत्रात फारसा यशस्वी होऊ शकला नाही. सध्या तो परदेशात बिझनेस करत आहे.

साहिल खान – एक्स्क्यूज मी, स्टाईल यासारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला साहिल खान याने सुद्धा अभिनयक्षेत्राला अलविदा केला आहे. साहिल ग्लॅमरस लाईफ पासून दूर असून तो स्वतःचे फिटनेस ट्रेनिंग चालवत असून लाखोंची कमाई करतोय. गोव्यात त्याने व्यवसाय सुरु केला आहे. बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटानंतर साहिलने बॉलिवूड इंडस्ट्रीला राम राम ठोकला.

झील मेहता – तारक मेहता कार्यक्रमात सोनूचे पात्र झील मेहता या अभिनेत्रीने साकारलं होत. २०१२ मध्ये तिने शो सोडला आणि आपलं शिक्षण पूर्ण करण्यास भर दिला. आता झील पूर्णपणे अभिनयक्षेत्र सोडून मेकअप आर्टिस्ट बनली आहे.

संदली सिन्हा – २००१ मध्ये तुम बिन या चित्रपटाद्वारे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी संदली सिन्हा फार काळ बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये टिकू शकली नाही. तुम बिन नंतर अयशस्वी झाल्यानंतर संदलीने बॉलिवूड सोडले. आता सध्या ती ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ या बेकरी ब्रँडची सह मालक म्हणून काम करत आहे.

मयुरी कांगो – मयुरी कांगो सुद्धा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये फार यशस्वी होऊ शकली नाही. इंडस्ट्रीतील अपयशानंतर मयुरी बॉलिवूडपासून दुरावली. सध्या ती गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड म्हणून काम करत आहे.

विवेक मश्रू – सीआयडी इन्स्पेक्टर विवेकच्या भूमिकेत दिसलेला विवेक मश्रूने अभिनयक्षेत्र सोडून मार्ग बदलला आहे. विवेक सध्या बंगरूळमध्ये आपल्या कुटुंबासह आनंदी जीवन जगत आहे. बंगरूळ येथील एका विद्यापीठात विवेक सध्या प्राध्यपकाची नोकरी करत आहे.

 

 


हेही वाचा : कार्तिक आर्यन अ‍ॅक्टिंग सोडून करणार फूड ब्लॉगिंग?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -