घरमनोरंजनया मराठी अभिनेत्री आहेत बिझनेस वुमन

या मराठी अभिनेत्री आहेत बिझनेस वुमन

Subscribe

मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी हल्ली केवळ अभिनय एके अभिनय एवढंच करत नाही. त्यांचे काही ना काही व्यवसायही सुरू असतात.तुमच्या आवडत्या अभिनेत्री फक्त अभिनयच करतात असं नाही, तर त्यांच्यापैकी अनेक जणी बिझनेवुमन देखील आहेत. अनेकींनी स्मार्टपणे स्वत:च्या आवडीचे व्यवसाय उभारले आहेत. शूटिंगच्या धावपळीच्या वेळापत्रकातून वेळ काढत त्या स्वत:चा ‘कारोबार’ व्यवस्थित सांभाळत असतात.

निवेदिता सराफ – ‘हंसगामिनी’

अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ या एक यशस्वी उद्योजिका देखील आहेत. त्यांचा स्वतः साड्यांचा ब्रँड असून, त्या स्वत: साड्या डिझाईन देखील करतात. ‘हंसगामिनी’ हा त्यांच्या साड्यांचा ब्रँड असून, त्यांच्या ब्रँडच्या साड्यांना मोठी मागणी आहे.

- Advertisement -

अभिज्ञा भावे आणि तेजस्वीनी पंडित- ‘तेजाज्ञा’

मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्रींचा स्वतंत्र्य ब्रँड आहे. तेजाज्ञा असं त्यांच्या ब्रँडचे नाव आहे. या ब्रँडच्या अंतर्गत त्या दोघी जणी डिझायनकर कपडे तयार करतात. या दोघींचा ‘तेजाज्ञा’ हा ब्रँड सगळ्यांमध्ये फारच चर्चेत आहे.

​​तितिक्षा तावडे आणि खुशबु तावडे – ‘साइडवॉक’

अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेत्री खुशबु तावडे या दोन्ही सख्या बहिणींनी अभिनयाव्यतीरिक्त दोघीही उद्योग विश्वात सक्रिय झाल्या आहेत. खुशबू ही कॉफी प्रेमी असून, तिने अनेकदा कॉफी पिण्याच्या आवडीबद्दलही सांगितले आहे. या दोघींचा ‘साइडवॉक’ नावाचा कॅफे असून, या कॅफेसाठी दोघीही मेहनत घेताना दिसतात.

- Advertisement -

अपूर्वा नेमळेकर – ‘अपूर्वा कलेक्शन’

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड असून, ‘अपूर्वा कलेक्शन’ असे त्याचे नाव आहे. अपूर्वाला दागिने परिधान करण्याची आवड तर आहेच, परंतु तिला दागिने डिझाईन करायला देखील आवडतात.

आरती वडगबाळकर- कलरछाप’

आरती वडगबाळकर ही लोकप्रिय अभिनेत्री. टाइम पास, आम्ही दोघी, डबलसीट सारख्या चित्रपटामध्ये झळकलेल्या आरतीचा ‘कलरछाप’ नावाचा ब्रँड आहे. सुटसुटीत कॉटनचे ड्रेस, साड्या ही तिच्या या ब्रँडची खासियत आहे.

गिरीजा ओक- ‘फ्रेश लाईम सोडा’

गिरीजा ओक गोडबोले हे केवळ मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीमधलं एक मोठ्ठ नाव. गिरीजाचा ‘फ्रेश लाईम सोडा’ नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे. जेन्टस क्लोथिंग आणि कपल ट्विनिंग ही या ब्रँडची खासियत आहे.

क्रांती रेडकर- ‘झिया-जायदा’

अभिनेत्री क्रांती रेडकर मराठी कलाक्षेत्रामधील मोठं नाव आहे. तिने आपला स्वतःचा कपड्याचा बँड सुरु केला आहे. आपल्या मुलीच्या नावाने तिने ‘झिया-जायदा’ नावानं तिनं हा ब्रँड सुरू केला आहे.

_____________________________________________________________

हेही वाचा : ‘पुन्हा दुनियादारी’! सई ताम्हणकरने केली चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -