घरमनोरंजन'पुन्हा दुनियादारी'! सई ताम्हणकरने केली चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा

‘पुन्हा दुनियादारी’! सई ताम्हणकरने केली चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा

Subscribe

दुनियादारी हा मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात जास्त गाजलेल्या सिनेमांपैकी एक. श्रेयस, मीनू, शिरीन, दिगंबर अर्थात डीएसपी, सुरेखा या पात्रांबरोबरच एस. पी. कॉलेज, कट्टा, हातमळणी हॉस्पिटल या जागाही हिट करणारा दुनियादारी हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजला. कॉलेज लाईफ, कट्ट्यावरची धमाल, मैत्री या सगळ्या विषयावर भाष्य करणारा सिनेमा आजही अनेकजण पाहतात. या सिनेमातील गाणीही तितकीच प्रेक्षकांच्या आवडीची आहेत. आजही दुनियादारी या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांच्या मनात आहे. पण आता या सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतीच मॅशेबल इंडियाच्या द बॉम्बे जर्नी या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिला शोचा होस्ट सिद्धार्थने तुम्ही सगळ्यांनी दुनियादारी सिनेमाच्या कास्टच्या रियुनियनचा विचार केला आहे का? असा प्रश्न विचारला त्यावेळी सईने दुनियादारी  सिनेमाच्या सिक्वेलवर काम करत असल्याची गोष्ट रिव्हील केली. ती म्हणाली,”खरंतर आम्ही दुनियादारी सिनेमाच्या सिक्वेलवर काम करतोय. मी ही गोष्ट आधी कोणत्याही मुलाखतीमध्ये रिव्हील केली नाही. मी पहिल्यांदा या शोमध्ये बोलतेय. मी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली आहे. खरंच खूप चांगली स्क्रिप्ट आहे. अजून आम्ही याविषयी घोषणा केली नाहीयं, आणि मला आशा आहे की, आम्ही हा सिनेमा बनवू. आता आम्ही फक्त सुरुवातीच्या टप्प्यावर काम करत आहोत.

- Advertisement -

तिला दुनियादारी नंतर तुला पुन्हा तसेच रोल ऑफर झाले का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सई म्हणाली, “नाही, दुनियादारी नंतर मला तसे रोल ऑफर झाले नाहीत. त्या ऐवजी मला एक अतिशय वेगळा रोल पिकनिक नावाच्या सिनेमासाठी ऑफर करण्यात आला होता. पण हंटर या सिनेमानंतर मला ज्योत्स्ना या भूमिकेसारखे अनेक रोल्स ऑफर झाले पण मी ते नाकारले.” असं ती यावेळी म्हणाली.

सईच्या या खुलासाने दुनियादारीच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये आनंद व्यक्त केला. या सिनेमात कोणते कलाकार असणार? सिनेमाची स्टोरी काय असेल? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल. दुनियादारी या सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव दुनियादारीच्या सिक्वेलची घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.

- Advertisement -

दुनियादारी हा सिनेमा अकरा वर्षापूर्वी पडद्यावर आला. लेखक सुहास शिरवळकर यांनी लिहिलेली ही कादंबरी संजय जाधव यांनी सिनेमाच्या रूपात पडदयावर आणली. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी, वर्षा उसगावकर, संदीप कुलकर्णी अशी तगडी गँग या सिनेमात होती.

दरम्यान सई लवकरच वेगवेगळ्या वेब सिरीज आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’ आणि ‘भक्षक’नंतर आता येत्या काळात सई ‘डब्बा कार्टल’, ‘अग्नी’, ‘ग्राउंड झिरो’ अशा प्रोजेक्टमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. अग्नी ही तिची आगामी वेबसिरीज असून यातून ती एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

________________________________________________________________

हेही पहा : 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -