घररायगडLok Sabha Election 2024 : रायगडसाठी 'दर' ठरले

Lok Sabha Election 2024 : रायगडसाठी ‘दर’ ठरले

Subscribe

निवडणूक आयोगाकडून रायगड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रेटकार्ड निश्चित करण्यात आले.

अलिबाग : लोकसभा निवडणुकीसाठी कुरुक्षेत्र सज्ज झाले आहे. रायगड जिल्ह्यासाठी म्हणायचे तर दोन्ही बाजूचे उमेदवार घोषित झालेत, प्रचार सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला खर्चासाठी 95 लाखांची मर्यादा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यातील उमेदवारांसाठी प्रचाराचे रेटकार्ड निश्चित केले आहे.

आचारसंहितेचे नियमांचे पालन करत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यादृष्टीने निवडणूक आयोग अत्यंत बारकाईने सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. प्रचारासाठी रॅली, सभामंडप, लाऊडस्पीकर यासह ढोल-ताशांचा वापर केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रत्येक वस्तूचे दर निश्चित केले आहेत. उमेदवारांना चहासाठी 10 रुपये, कॉफीसाठी 12 रुपये तर बिस्कीट पुड्यासाठी 10 रुपये खर्च करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. नाश्त्यासाठी पोहे किंवा उपमा घेतला तर 20 रुपये आणि वडापावसाठी 10 रुपये शिवाय समोसा किंवा कचोरीसाठी 12 रुपये आणि इडली चटणीसाठी 15 रुपये दर ठरवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Lok Sabha Election 2024 : पेणमधील वीटभट्टी-हॉटेलमालक ७ मे रोजी काय करणार?

लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रचाररथांचा वापर करतात. म्हणून निवडणूक आयोगाने टॅक्सी किंवा कार प्रत्येकी 12 तासांसाठी 3 हजार 990 रुपये, प्रवासी बस 200 किलोमीटरसाठी 14 हजार 115 रुपये, तर जेसीबी प्रती तास इंधनासह एका हजार रुपये असे दर निश्चित केले आहे. या सर्व खर्चाची निवडणूक आयोगाच्या ड्युटीवर असणारे जिल्ह्यातील अधिकारी काटेकोरपणे तपासणी करत असतात.

- Advertisement -

हेही वाचा… Mahad Illegal sand mining : शासकीय वाळू विक्रीच्या नावाखाली बनवाबनवी!

प्रचारासाठी शहरी भागात मंगल कार्यालय घेतल्यास 20 हजार रुपये, ग्रामीण भागात घेतल्यास कमाल 15 हजार रुपये मोजावे लागतील, मैदान भाड्याने घेतल्यास आकाराप्रमाणे 5 ते 50 हजार रुपये दर ठरवण्यात आला आहे. शिवाय छोट्या हारांसाठी 50 ते 100 रुपये आणि मोठ्या हारांसाठी 150 ते 200 रुपये निवडणूक आयोगाचे ठरवून दिले आहेत. तसेच उमेदवाराने ढोल-ताशे वापरल्यास निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसार तो खर्च ग्राह्य धरला जाईल.

निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या दरानुसार खर्च करावा लागेल आणि बिलासह नोंद करावी लागणार आहे. यावेळी निवडणूक प्रचार आणि रॅलींमध्ये वापरल्या जाणाऱ्या झेंड्याची किंमत आकाराच्या आधारे ठरवण्यात आली आहे. निवडणुकीत उमेदवाराने प्रचारावर किती खर्च करायला हवा, याची मर्यादा निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात येते. या मर्यादेपेक्षा अधिक खर्च करणे म्हणजे आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असते. त्याबद्दल उमेदवारांना नोटीस पाठवून जाब विचारला जातो.

उमेदवारांना प्रचार करताना आणखीही बऱ्याच बाबींवर खर्च करावा लागतो. त्याची दरसूची गुरुवारी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्याचे रेट कार्ड

  • व्हेज बिर्याणी, रायता – 50 रुपये
  • व्हेज पुलाव, रायता – 50 रुपये
  • भोजन प्लेट – 90 रुपये
  • चिकन थाळी – 230 रुपये
  • मटण थाळी – 330 रुपये
  • अंडा थाळी – 200 रुपये
  • पाणी (250 एमएल) बॉक्स – 60 रुपये
  • मुखवटे – 25 रुपये
  • नारळ – 20 रुपये
  • शाल – 50 ते 150 रुपये
  • फेटा – 100 ते 200 रुपये
  • शाल – 50 ते 150 रुपये
  • हेलिपॅड – 10 हजार रुपये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -