घरमनोरंजनTIFF 2020 : दिग्दर्शक चैतन्य ताम्हणेंचा ‘दि डिसाइपल’ टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मानित

TIFF 2020 : दिग्दर्शक चैतन्य ताम्हणेंचा ‘दि डिसाइपल’ टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मानित

Subscribe

मराठमोळा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांच्या ‘दि डिसायपल’ला टोरांटो महोत्सवात Amplify Voice Award ने गौरविण्यात आले आहे. व्हेनिस पाठोपाठ हा त्याला दुसरा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळत आहे. हा पुरस्कार त्याला ‘नाईट ऑफ दि किंग्ज़’ चित्रपटाबरोबर विभागून मिळाला आहे. पहिल्या दोन चित्रपटांसाठीचा हा पुरस्कार जागतिक सिनेमातील उद्याचे दिग्दर्शक म्हणून दिला जातो. चैतन्य यांनी आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबाबत व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. या सन्मानासाठी त्याने ‘दि डिसायपल’शी संबंधीत लोकांचे आभार मानले असून सध्या कोरोना संकटामुळे मुंबईत अडकलो असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

४५ व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा पुरस्कार चैतन्य यांच्या चित्रपटाला मिळाला आहे. अॅम्प्लीफाई वॉईस अॅवॉर्ड ज्युरीने दि डिसाइपल चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. शनिवारी मीरा नायर यांच्या बीबीसी स्टुडिओ सीरिजमधील अ सुटेबल ब्वॉय निर्मित TIFF 2020 चा समारोप करण्यात आला. यापूर्वी ७७ व्या वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्येही ‘दि डिसाइपल’ला बेस्ट स्क्रीनप्ले का अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा –

‘पवार साहेबांचा कोणी गेम केला असेल, तर तो अजित पवारांनीच’; निलेश राणेंची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -