घरमनोरंजनअरिजीत सिंहचा शो रद्द केल्याप्रकरणी तृणमूल आणि भाजपामध्ये जुंपली; पर्यायी जागेचा शोध सुरू

अरिजीत सिंहचा शो रद्द केल्याप्रकरणी तृणमूल आणि भाजपामध्ये जुंपली; पर्यायी जागेचा शोध सुरू

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजीत सिंहच्या गाण्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्याने गायलेली प्रत्येक गाणी सुपरहिट ठरतात. भारतात तसेच परदेशातही अरिजीतचे अनेक लाईव्ह कॉन्सर्ट होत असतात. त्याचे चाहते त्याची गाणी प्रत्यक्षात ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. यामुळेच येत्या 18 फेब्रुवारीला कोलकातामधील ईको पार्कमध्ये होणार लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या समोर ‘रंग दे तू मोहे गेरुआ’गाणं गायल्यामुळे हा शो रद्द केला असल्याचा आरोप भाजपाने केला होता.

तर याचं मुद्द्यावर तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितलं की, भाजपा त्यांच्यावर खोटे आरोप लावत आहे. अरिजीत सिंगचे कॉन्सर्ट रद्द करण्यामागे असं कोणतेही कारण नाही. खरंतर काही वेगळ्या कारणांमुळे अरिजीत सिंगच्या कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

पर्यायी जागांचा शोध
अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टबाबत तृणमूल काँग्रेसने सांगितले की, “अरिजीत सिंहची कॉन्सर्ट त्याचं तारखेला आयोजित केली जाईल आणि त्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरु आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत होत्या. अरिजीत सिंहने ‘रंग दे तू मोहे गेरुआ’गाणे गायले होते. ज्यामध्ये गेरुआ(भगव्या) रंगाचा शब्दाचा उल्लेख आहे. ”

जी-20 च्या बैठकीमुळे रद्द झाला कार्यक्रम
मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितले की, “अरिजीतचा ईको पार्कमधील शो रद्द करावा लागला कारण, त्याच वेळी इको पार्कजवळील विश्व बांग्ला कन्वेंशन सेंटरमध्ये जी-20 ची एक बैठक होणार आहे. ज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अतिथी सहभागी होणार आहेत. त्यांनी सांगितलं की, जानेवारीच्या शेवटी इको पार्कमध्ये सलमान खानचा एक कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे. परंतु यामुळे कोणताच वाद झाला नाही.”

- Advertisement -

 


हेही वाचा  :

प्रार्थना..! ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -