घरमनोरंजनCID टीम पुन्हा एकदा झळकणार छोट्या पडद्यावर

CID टीम पुन्हा एकदा झळकणार छोट्या पडद्यावर

Subscribe

CID टीम पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस

छोट्या पडद्यावरून CID ही टेलिव्हिजन मालिका बंद झाल्याने या मालिकेचे चाहते काहीसे नाराज झाले आहे. परंतु या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे CID टीम पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकते. सर्वाधिक काळ चालणाऱ्या या CID मालिकेतील काही पात्र एका नव्या मालिकेतून पुन्हा एकत्र बघायला मिळणार आहे.

ही नवी मालिका पोलिसांवर आधारलेली असून या मालिकेत काही वैयक्तिक घटनांचा देखील समावेश असणार आहे. दयानंद शेट्टी (दया), आदित्य श्रीवास्तव (अभिजीत), आणि अंशा सैयद (इंस्पेक्टर पूर्वी) या मालिकेचा भाग असणार आहे.

- Advertisement -

२०१८ मध्ये निर्मात्यांनी CID एक छोटा ब्रेक घेणार अशी अधिकृत घोषणा केली होती. या सोबत नवीन केस घेऊन CID ची संपुर्ण टीम पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

- Advertisement -

ही येणारी मालिकेत पहिल्यांदा १९९७ साली सोनी टिव्हीवर सुरू झाला होता. ही मालिका मुंबईच्या क्राइम इंवेस्टिगेशन डिपार्टमेंट (सीआईडी) साठी काम करणारी डिटेक्टिव टीम संदर्भात आहे. या मालिकेतून एसीपी प्रद्युम्न, सीनियर इंस्पेक्टर अभिजीत, सीनियर इंस्पेक्टर दया, इंस्पेक्टर फ्रेडरिक्स आणि डॉ साळुंके यांच्या भूमिका प्रसिद्ध झाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -