घरदेश-विदेश'या' देशातील नागरिक पितात इतरांपेक्षा जास्त दारु

‘या’ देशातील नागरिक पितात इतरांपेक्षा जास्त दारु

Subscribe

जगभरात विविध देशातील लोक मद्यपान करतात. या मद्यपाना संदर्भात एक सर्वेक्षण कंपनीने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात कोणत्या देशात सर्वात जास्त मद्यपान केले जाते, याची माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालात सर्वाधिक मद्यपान करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक लागला आहे.

मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. परंतु, तरीही नागरिक मद्यपान करतात. मद्यपानामुळे शरीरात विविध विकार होतात. कॅन्सर सारखे जटील आजारही मद्यपान केल्यामुळे होतात. त्यामुळे विविध माध्यमांतून मद्यपानापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तरीदेखील लोक मोठ्या प्रमाणात मद्यपान करतात. यासंदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका सर्वेक्षणानुसार ब्रिटन देशातील नागरिक सर्वाधिक प्रमाणात मद्यपान करत असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात सर्वाधिक मद्यपान करणाऱ्यांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक लागतो.

‘मद्यपान करणे आरोग्यास हानिकारक’

‘ग्लोबल ड्रग सर्वे २०१९’ या सर्वेक्षणाचा अहवाल गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. या अहवालात ब्रिटिश सर्वाधिक प्रमाणात मद्यपान करत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय ब्रिटिशांचा मद्यपानाचा टक्का दरवर्षी वाढत असल्याचे समोर आले आहे. ‘ग्लोबल ड्रग सर्वे’चा कर्ताधर्ता आदम विनस्टोक म्हणाला की, ‘ब्रिटनचे नागरिक मोठ्या प्रमाणात मद्यपान करतात. इतके मद्यपान करने आरोग्यास हानिकारक आहे. मद्यपान करणे आपल्या संस्कृतीचा भाग नाही. त्यामुळे मद्यपान करुन आरोग्याशी खेळणे योग्य नाही.’ यापुढे विनस्टोक म्हणाले की, ‘मद्यपानामुळे यकृताचे विकार आणि कॅन्सर होऊन मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मद्यपान वाईट आहे. त्याचे प्रमाण कमी व्हायला हवे.’

- Advertisement -

काय आहे सर्वेक्षणात?

‘ग्लोबल ड्रग सर्वे’ने १,२३,८१४ जणांचा अभ्यास केला. हे सर्वेक्षण ३० देशांमध्ये केले गेले आहे. गेल्या वर्षभरातल इंग्लंडच्या नागरिकांचे मद्यपानाचे प्रमाण ५१.१ पटीने वाढले आहे. अमेरिकेत वर्षभरात ५० पटीने, कॅनडामध्ये ४८ पटीने तर ऑस्ट्रेलियामध्ये ४७ पटीने मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. या यादीत भारताचा सहावा क्रमांक लागतो. गेल्या वर्षभरात भारतात ४१ पटीने मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. तर चिले या देशात सर्वात कमी प्रमाणात मद्यपान केले जात असल्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -