Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन तावडे बहिणींचं अनोखं रक्षाबंधन !!

तावडे बहिणींचं अनोखं रक्षाबंधन !!

Subscribe

रक्षाबंधन म्हणजे भावंडांमधील अनोखे बंधन अगदी जिव्हाळ्याचा सण !! या सणाला बहीण भाऊ एकमेकांना राखी बांधतात व छानशी भेटवस्तू घेतात. प्रत्येकजण हा सण साजरा करतो. मग त्याला कलाकारही अपवाद कसे राहतील. हा सण कलाकारमंडळीही अनोख्या पद्धतीने साजरा करत असतात. कुणी एखादी पोस्ट लिहितो, कुणी फोटो शेयर करतो तर कुणी त्यांच्या घरगुती सोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असतात. झी मराठीवरील नवीन मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हीने आपल्या खास आठवणी शेयर केल्यात, ”रक्षाबंधनाचा दिवस आमच्यासाठी जिव्हाळ्याचा राहिला आहे कारण घरात नेहमीच खेळीमेळीचं वातावरण राहिल आहे.

दरवर्षी सकाळी पहिली राखी देवाला, दुसरी राखी आमच्या बाबांना आणि तिसरी राखी मी आणि तितिक्षा एकमेकींना बांधायचो. लहानपणी जेव्हा कळतं वय नव्हतं तेव्हा फक्त भेटवस्तूंसाठी राखी बांधायचो ,पण जेव्हा मोठे झालो तेव्हा कळायला लागलं तेव्हापासून बहिणीचं हे बंधन आणि नातं जोपासण्यासाठी आम्ही हा सण साजरा करायचं ठरवले.

- Advertisement -

ह्यावर्षीचं रक्षाबंधन आमच्यासाठी खास आहे कारण आम्ही दोघी बहिणी झी मराठीवरील दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत काम करत आहोत व ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझी नवीन मालिका जी दोन बहिणींवर आधारित आहे व ह्याच मालिकेच्या प्रोमोशन निम्मिताने आम्ही दोघीनी पूर्ण महिना साजरा केला आहे. एकमेकींना भेट वस्तू पण दिल्या आहेत. ह्या वर्षी कितीही कामात व्यस्त असलो तरीही एकमेकींसाठी नक्की वेळ काढून भेटणार आहोत व हा दिवस साजरा करणार आहोत. प्रत्येक बहिणींनी आपली नाती जपावी हा संदेश तर आम्ही आमच्या मालिकेतून देतच आहोत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.”


हेही वाचा : स्वरा भास्करचे मॅटरनिटी फोटोशूट पाहिलतं का?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -