घरमनोरंजनपाण्याची दखल घेतली जात आहे

पाण्याची दखल घेतली जात आहे

Subscribe

रोटी, कपडा और मकान यानंतर काय तर सध्यातरी पाणीच म्हणता येईल. हा विषय जागतिक पातळीवरील मोठ्या चर्चेचा विषय झालेला आहे. पर्यावरण संवर्धन न झाल्यामुळे माणूस आपल्या सोईसाठी सिमेंट, काँक्रीटला महत्त्व देत आहे. त्याचा परिणाम पडणार्‍या पावसावर होऊन आता पाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. कितीतरी गावे या पाणीटंचाईमुळे ओळखली जात आहेत. अशाच दुष्काळग्रस्त आणि पाणीटंचाईला सामोरे गेलेल्या गावाची कथा ‘एक होतं पाणी’ या चित्रपटामध्ये घेतलेली आहे. ज्वलंत विषय असल्यामुळे त्याची मांडणीही त्याचदृष्टीने केलेली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले की अशा चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष जाते. ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाला अमरनाथ चित्रपट महोत्सवामध्ये अनेक पारितोषिके प्राप्त झालेली आहेत आणि आता ६ व्या ‘नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ मध्ये या चित्रपटाला ज्युरी पुरस्काराने सन्मानीत केलेले आहे.

‘न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज’ व ‘काव्या ड्रीम मुव्हीज’ यांनी पुढाकार घेऊन ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आशिष निनगुरकर हा या चित्रपटाचा लेखक असून, रोहन सातघरे याने त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ‘पाणी वाचवा’ हा संदेश देण्याचा प्रयत्न निर्मात्याला अधिक जवळचा वाटला. विजय तिवारी व डॉ. प्रवीण भुजबळ यांनी एकत्र येऊन या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हंसराज जगताप याची यात मुख्य भूमिका आहे. उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, दिपज्योती नाईक यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -