घरमनोरंजनउर्फीने कॉपी केला राजपाल यादवचा छोटा पंडित लूक; व्हिडीओ व्हायरल

उर्फीने कॉपी केला राजपाल यादवचा छोटा पंडित लूक; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

आपल्या हटके स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अतरंगी स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. दरम्यान अशातच, उर्फीचा आणखी एक नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने अभिनेता राजपाल यादवचा ‘भूलभुलैया’मधील लूक कॉपी केला आहे.

उर्फीने कॉपी केला छोटा पंडित लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

नुकत्याच केलेल्या लूकमध्ये उर्फीने केशरी रंगाचे धोतर घातले असून यासोबतच तिने लाल रंगाचा फुल स्लीव्ह टॉप घातला आहे. तिने चेहरा आणि केसांना लाल रंगही दिला आहे. तसेच गळ्यात झेंडूच्या फुलांची माळ घातली आहे. शिवाय तिच्या कानामागे दोन अगरबत्ती ठेवल्या आहेत.

- Advertisement -

हा व्हिडीओ शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “खूप मेहनत करून हॅलोवीन पार्टीसाठी तयार झाले पण जाऊ शकले नाही, म्हणून फक्त व्हिडिओ पोस्ट करावा असं वाटलं.” उर्फी जावेदच्या या पोस्टवर अनेकांनी राजपाल यादवचे GIF शेअर केले आहेत.उर्फी जावेदच्या या लूकवर लोकांनी कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, उर्फीला बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धी मिळाली. उर्फी ही बिग बॉसमध्ये फार काळ नव्हती. पण, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर उर्फीला सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. नुकतेच उर्फीने ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये पाहुणी म्हणून एंट्री घेतली होती.

- Advertisement -

 


हेही वाचा :

भर कार्यक्रमात रेखाने धरले शत्रुघ्न सिन्हा यांचे पाय; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -