घरदेश-विदेशकेरळमध्ये प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट, घटनेत एकाचा मृत्यू, 36 जण जखमी

केरळमध्ये प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट, घटनेत एकाचा मृत्यू, 36 जण जखमी

Subscribe

केरळ राज्यातील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज रविवारी (ता. 29 ऑक्टोबर) सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर 36 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

एर्नाकुलम : केरळ राज्यातील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज रविवारी (ता. 29 ऑक्टोबर) सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर 36 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. कळमसेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेसाठी अनेक लोक जमले असताना हा स्फोट झाला. पहिला स्फोट सकाळी 9 वाजताच्या सुमारास पहिला स्फोट झाला आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटांत एकामागून एक दोन स्फोट झाले. या घटनेच्या तपासासाठी एनआयए आणि एनएसजीची टीम केरळला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Three deadly explosions at a place of worship in Kerala, one dead, 36 injured)

हेही वाचा – मद्यधुंद कारचालक महिलेने तिघांना उडवले, चेंबूरमधील घटनेने खळबळ

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवस सुरू असलेल्या प्रार्थना सभेचा आजचा दिवस होता. ज्यावेळी ही प्रार्थना सुरू होती, त्यावेळी प्रार्थनेमध्ये सुमारे 2 हजार लोक उपस्थित होते. या स्फोटाबाबत बोलताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे. एर्नाकुलममधील अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. मी पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. तपासानंतर अधिक माहिती मिळेल. तसेच, या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी बोलून स्फोटानंतर राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली. शहा यांनी एनआयए आणि एनएसजीच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेनंतर केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सुट्टीवर गेलेल्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाचे संचाक आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना जॉर्ज यांनी निर्देश दिले आहेत. तसेच, केरळचे डीजीपी डॉ. शेख दरवेश यांनी माहिती देत सांगितले की, आज सकाळी साधारणतः 9 वाजून 40 मिनिटांच्यादरम्यान जमरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये एक स्फोट झाला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि 36 लोकांवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. आमचे अतिरिक्त डीजीपी देखील मार्गावर आहेत. मी देखील लवकरच घटनास्थळी पोहोचेन. आम्ही या घटनेचा सखोल तपास करत असून यामागे कोण आहे? ते शोधून काढू आणि संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करू.

- Advertisement -

या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना तत्काळ या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय दिल्लीतील तपास यंत्रणांना देखील अमित शहा यांच्याकडून अलर्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सदर घटनेच्या ठिकाणी एनआयएचे पथक दाखल झाले आहे. एकापाठोपाठ एक तीन स्फोट झाल्याने केरळमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -