घरमनोरंजनउर्फीचा 'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल लूक चर्चेत

उर्फीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल लूक चर्चेत

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान आज उर्फीने व्हॅलेंटाईन डे स्पेशल खास लूक केला आहे.

उर्फीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल लूक पाहा

उर्फी जावेद व्हॅलेंटाईन डेला ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने 14 फेब्रुवारीला खास ड्रेस परिधान केला आहे.

- Advertisement -

‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त उर्फीने तिचा खास लूक शेअर केला आहे. ज्यात उर्फीने बेबी पिंक कलरचा ट्युब टॉप घातला असून खाली त्याच रंगाचा स्कर्ट घातला आहे. शिवाय तिच्या या ड्रेसला गुलाबाचे एक मोठे फूल देखील लावलेले आहे. यावेळी उर्फीला पाहून अनेकांनी तिच्यासोबत फोटो काढले. उर्फीचा हा लूक पाहून चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत.

‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये पाहुणी म्हणून एंट्री

उर्फीने बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धी मिळाली. उर्फी ही बिग बॉसमध्ये फार काळ नव्हती. पण, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर उर्फीला सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. नुकतेच उर्फीने ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये पाहुणी म्हणून एंट्री घेतली होती.


हेही वाचा : Malaika Arora: ‘तो’ व्हिडीओ पाहून संतापली मलायका; म्हणाली, हे सहन करण्यापलीकडे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -