घरमनोरंजन'सुई धागा' चित्रपटाचा युनिक लोगो झाला प्रदर्शित

‘सुई धागा’ चित्रपटाचा युनिक लोगो झाला प्रदर्शित

Subscribe

'सुई - धागा: मेड इन इंडिया' चित्रपटाचा युनिक लोगो वरूण धवन आणि अनुष्का शर्माकडून प्रदर्शित करण्यात आला असून भारतातील कानाकोपऱ्यातून हा लोगो बनवून घेण्यात आला आहे.

वरूण धवन आणि अनुष्का शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर ‘सुई – धागा: मेड इन इंडिया’ चित्रपटामधून एकत्र येत आहेत. यामधील दोघांचाही लुक अगदी वेगळा आहे, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा लोगो वरूण आणि अनुष्कानं प्रदर्शित केला असून हा लोगो अगदीच युनिक आहे. दरम्यान हा लोगो प्रदर्शित करत असताना अनुष्का आणि वरूण यांनी यामागील कथादेखील वेगळ्या अंदाजात लोकांसमोर आणली आहे. यशराजची टीम हा लोगो घेऊन देशभरातील अनेक कलाकारांकडे गेली आणि त्यांच्याद्वारे या स्टेनसिल्सवर एम्रॉड्ररी बनवून घेण्यात आली. अशा तऱ्हेनं हा युनिक लोगो तयार करण्यात आला.

कसा तयार झाला लोगो?

अनुष्का आणि वरूणनं व्हिडिओ तयार केला आहे. ज्यामध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कानाकोपऱ्यातील कलाकारांकडून ही कलाकुसर करून घेण्यात आला आणि हा लोगो बनवण्यात आला. सर्वात पहिले यशराजची पूर्ण टीम वरूण आणि अनुष्काजवळ ही कलाकुसर करून घेण्यासाठी पोचली होती. त्यांना दोघांनाही सुई – धाग्यानं नाव आपल्या अंदाजात शिवण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ही टीम संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात फिरली आणि त्याचा एक वेगळा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

- Advertisement -

कसा आहे लोगो?

चित्रपटासाठी तयार करण्यात आलेल्या लोगोमध्ये काश्मीरमधील कशीदा आणि सोजनी हा प्रकार, पंजाबमधील फुलकारी, उत्तर प्रदेशमधील फुलपट्टी, लखनऊमधील जरदोजी, राजस्थानमधील आरी, बंजारा आणि गोटा पट्टी अशा स्वरुपाच्या वेगवेगळ्या कलाकुसरींनी सजवण्यात आलं आहे. दरम्यान हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून याचं दिग्दर्शन शरत खटारियानं केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -