घरमुंबई'किकी चॅलेंज'ची स्टंटबाजी पोलिसांसाठी ठरतेय डोकेदुखी!

‘किकी चॅलेंज’ची स्टंटबाजी पोलिसांसाठी ठरतेय डोकेदुखी!

Subscribe

ब्ल्यू व्हेल बरोबरच व्हायरल होणारा मोमो नावाचा आणखी एक गेम सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या गेममुळेसुद्धा अनेकांचे जीव जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर ‘किकी चॅलेंजविषयी’ पोलिसांनी आवाहन करूनसुद्धा असे स्टंट करण्यात येत आहेत.

सध्या इंटरनेटवर एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सनी धुमाकूळ घातला आहे. त्यात प्रामुख्याने तरुणाची बळी जात आहे. काही दिवसांपूर्वी ब्ल्यू व्हेल नावाच्या गेमने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. हा गेम खेळणार्‍या अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला. या गेमची सुरुवात रशियातून झाली. तो जगभर पसरला. त्याचे पडसाद मुंबईतही उमटताना पाहायला मिळाले. यानंतर हा गेम प्ले स्टोअरवरून हटवण्यात आला. गेम बनवणार्‍या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. आता एक नवीन आव्हान पोलिसांसमोर आले आहे. ‘किकी चॅलेंज’ असे या टास्कचे नाव आहे. यामध्ये चालत्या गाडीतून उतरून डान्स करण्याची अट घालण्यात आली आहे. ‘किकी डू यु लव्ह मी’ असे बोल असणारे हे गाणे ड्रेक नावाच्या पॉप सिंगरने गायले आहे. याच गाण्यावरून आता ही स्टंटबाजी करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर पसरणार्‍या या चॅलेंजमुळे अनेक तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून चालत्या गाडीतून उतरून स्टंट करायला सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकावरचा किकी चॅलेंजचा एक विडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा चालत्या ट्रेनमधून उतरून गाण्याचा हा स्टंट करताना दिसत आहे. जीव धोक्यात चालून ही स्टंटबाजी करण्यात येत असल्यामुळे वारंवार पोलिसांकडून आव्हान करूनसुद्धा तरुणांकडून ते पाळले जात नाही. या मुलाचा शोध सध्या पोलीस घेत असून अद्याप त्याच्यासंदर्भात कोणतीच माहिती हाती लागलेली नाही. दरम्यान मध्य रेल्वेकडून याचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

- Advertisement -

ब्ल्यू व्हेल बरोबरच व्हायरल होणारा मोमो नावाचा आणखी एक गेम सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या गेममुळेसुद्धा अनेकांचे जीव जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर ‘किकी चॅलेंजविषयी’ पोलिसांनी आवाहन करूनसुद्धा असे स्टंट करण्यात येत आहेत. किकी चॅलेंजसारखाच व्हायरल झालेल्या ब्ल्यू व्हेल गेममुळे एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. वेळीच या गेमला आळा घातल्यामुळे पुढे होणार्‍या आत्महत्या टळल्या.

का होतेय अशी स्टंटबाजी

किकी चॅलेंजसारख्या स्टंटमध्ये 12 ते 20 या वयातल्या तरुणांचा समावेश असून हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी त्यांच्यात मोठी स्पर्धा सुरू आहे. फेसबुक,युट्यूबसारख्या सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवून पैसे मिळवणे आणि आपण काहीतरी वेगळं करतोय हे दाखवण्यासाठी असे स्टंट तरुणाईकडून केले जात आहेत.

- Advertisement -

काय सांगतात मानसोपचारतज्ञ?

या चॅलेंजविषयी बोलताना माजी पोलीस अधिकारी आणि मानसोपचारतज्ञ धनराज वंजारी म्हणाले की, असे चॅलेंज पूर्ण करण्यामागे मानसिक स्थितीसुद्धा तितकीच जबाबदार आहे. एखादे चॅलेंज आपल्याला दिल्यानंतर ते पूर्ण करण्याची क्षमता आपल्या आहे आणि ते आपण पूर्ण करू शकतो, अशा आत्मविश्वासपोटीसुद्धा तरुण मुले हे पाऊल उचलतात. 12 ते 20 वर्षांच्या तरुणाईची हीच अवस्था असते.त्यामुळे या वयोगटातल्या मुलांचा यामध्ये समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -