घरमनोरंजनVarun Dhawan : वरुण धवन होणार बाबा, नताशाच्या बेबी बंपचा फोटो केला...

Varun Dhawan : वरुण धवन होणार बाबा, नताशाच्या बेबी बंपचा फोटो केला शेयर

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून वरुण धवनला ओळखले जाते. अभिनयाबरोबरच वरुण त्याच्या खोडकर स्वभावामुळे नेहमी चर्चेत असतो. वरुणने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. वरुणच्या नव्या पोस्टन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वरुण धवनची पोस्ट

वरुण लवकरच बाबा होणार आहे. वरुणची पत्नी नताशा गरोदर असून लवकर त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. वरुणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. वरुणने नताशा व त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये नताशा गरोदर असल्याचे दिसून येत आहे. तर वरुणने तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर करत लिहिले की, “आम्ही प्रेग्नंट आहोत, आम्हाला तुमच्या प्रेमाची व आर्शिर्वादाची गरज आहे.” वरुणची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

- Advertisement -

 नेटकऱ्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

वरुण धवनच्या फोटोवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स करत वरुण-नताशाला शुभेच्छा दिल्या आहेत. भूमी पेडनेकर, नेहा धूपिया, इसाबेल कैफ, मौनी रॉय, करण जौहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि सोनम कपूरसह अनेक सेलिब्रिटींनी वरुण – नताशाला शुभेच्छा दिल्या आहे.

वरुण- नताशाची लव्हस्टोरी

24 जानेवारी 2021 ला वरुण व नताशाने लग्नगाठ बांधली. केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला अलिबागच्या द मॅन्शन रिसॉर्टमध्ये या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. वरुण व नताशा लहानपणापासूनचे मित्र-मैत्रिण आहेत. दोघांचं एकत्र शिक्षण झालं आहे. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. वरुणने लग्नासाठी नताशाला अनेकदा विचारलं. पण कायमच ती नकार देत होती. अखेर नताशाने होकार दिला. वरुणने त्याच्या करिअरच्या सुरूवातीला नताशा आणि त्याच्या रिलेशनशिपबद्दल जगजाहीर केले नव्हते. मात्र दोघांना बऱ्याचवेळा एकत्र पाहिले गेले होते. आता लग्नाच्या तीन वर्षानंतर दोघे आई-बाबा होणार आहेत.

- Advertisement -

वरुण धवनचा आगामी चित्रपट

वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्यावर्षी त्याचा बवाल चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये त्याच्याबरोबर जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता लवकरच वरुणचा ‘बेबी जॉन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तो ‘सिटाडेल’ चित्रपटातही झळकणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर साऊथची अभिनेत्री सामंथा प्रभुची मुख्य भूमिका आहे. तसेच तो ‘स्त्री 2’ मध्येही दिसणार असल्याचे सांगण्यात येते. हा चित्रपट 30 ऑगस्ट 2024 ला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -