घरमनोरंजनविकी- कतरिनाच्या लग्नादरम्यान मोबाईलवर बंदी, तरीही वेडिंग व्हेन्यूचा व्हिडिओ व्हायरल

विकी- कतरिनाच्या लग्नादरम्यान मोबाईलवर बंदी, तरीही वेडिंग व्हेन्यूचा व्हिडिओ व्हायरल

Subscribe

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगतोय. यातच आत विक्की आणि कतरिना आपल्या कुंटुंबासह राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये पोहचतील. ७ डिसेंबरला म्हणजेच आजचं संगीत सोहळ्याने त्यांच्या लग्नाची सुरुवात होणार आहे. या फोर्टमध्ये प्रवेश करताच फतेह दरवाजा येथे पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्पवृष्टीने होणार आहे. सोबत राजस्थानी लोकगीतांनी पाहुण्यांचे स्वागत होणार आहे. यानंतर ८ डिसेंबरला मेंदही आणि ९ डिसेंबरला दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र विकी आणि कतरिना या शाही विवाहसोहळ्या आधी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार असल्याचे म्हटले जातेय. विकी आणि कतरिना लग्न सोहळ्यादरम्यानचे कोणतेही फोटो व्हिडिओ व्हायरल होऊ होऊ नये यासाठी मोबाईलवर बंदी घातली आहे तर तपासणीसाठी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. असे असतानाही विकी आणि कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कतरिना आणि विकीच्या वेडिंग व्हेन्यूच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक जोधा अकबर गाण्यातील ख्याजा मेरे ख्याजा या गाण्यावर डान्स करताना दिसतायत. हे डान्सर पाहूण्यांचे स्वागत करत आहेत. पण विकी- कतरिनाच्या लग्नात इतका कडक बंदोबस्त असतानाही व्हिडिओ व्हायरल झाला कसा? असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामुळे हा व्हिडिओ खरचं विकी-कतरिनाच्या वेंडिंग व्हेन्यूचा आहे असाही प्रश्न नेटकरी विचारतायत.

- Advertisement -

विकी-कतरिनाच्या लग्नातील खास सुरक्षा

विकी- कतरिनाने लग्नात मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. यात १० बॉडीगार्डचा समावेश आहे. यात लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची पहिले चेकिंग हॉटेलच्या प्रवेशद्वारावर आणि दुसरी चेकिंग बिंदू फतेह दरवाजा होणार आहेत. पोलिस कर्मचारी, खासगी बाऊन्सर आणि हॉटेलचे सुरक्षा रक्षक असे सर्वजण याठिकाणी तैनात असतील. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पाहुण्यांचे थर्मल स्क्रिनींग देखील होणार आहे.

- Advertisement -

लग्नाला उपस्थित राहणार ‘हे’ पाहुणे 

विकी- कतरिनाच्या लग्नाला फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला, मेक-अप मॅन आणि हेअरस्टायलिस्ट डॅनियल क्रिस्टोफर बॉअर, कॉस्च्युम डिझायनर अनिता अदजानिया श्रॉफ, फॅशन स्टायलिस्ट अक्षय त्यागी, सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टी हे देखील उपस्थित राहणार आहेत. सोबतच कतरिना आणि विक्की या दोघांचे जवळचे मित्र आणि सेलिब्रिटीही पोहोचणार आहेत. या लग्नात १२० पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -