घरताज्या घडामोडीराज्यात मिनी UPA चाच प्रयोग सुरू, आज राहुल गांधींची भेट घेणार -...

राज्यात मिनी UPA चाच प्रयोग सुरू, आज राहुल गांधींची भेट घेणार – संजय राऊत

Subscribe

गोव्यात तृणमूल, काँग्रेस व शिवसेना ?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नक्कीच मी आज भेटणार आहे. आम्ही ऐकमेकांशी संवाद ठेवत असतो. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत सहभागी झालेला पक्ष आहे. ऐकमेकांच्या मदतीने समान नागरिक कार्यक्रमांवरती आम्ही सरकार चालवत आहोत. सरकार उत्तम चालत आहे. त्यासाठी तिन्ही पक्षामध्ये संवाद असावा असं मला वाटतं. दरम्यान, वाजपेयींच्या नेतृत्त्वाखाली आणि विचाराधारांखाली अनेक एनडीएचे पक्ष होते. त्यामध्ये राम मंदिरालाही विरोध करणारे पक्ष होते. तसेच एनडीए आणि यूपीएमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे पक्ष होते. राज्यात मिनी युपीएचाच प्रयोग सुरू आहे. असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत सहभागी झालेला पक्ष आहे. ऐकमेकांच्या मदतीने समान नागरिक कार्यक्रमांवरती आम्ही सरकार चालवत आहोत. सरकार उत्तम चालत आहे. त्यासाठी तिन्ही पक्षामध्ये संवाद असावा असं मला वाटतं. त्यानुसार मी दिल्लीत असलो तरी आम्ही ऐकमेकांना भेटून चर्चा करतो. महाराष्ट्र राज्य, राज्य सरकार आणि देशाचा विकास आणि भविष्याबाबत आम्ही चर्चा करतो. असं खासदार संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

गोव्यात निवडणुका लढणार असल्याचं आम्ही नक्की केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये साधारण आम्ही चाचपणी करत आहोत. काँग्रेस पक्ष गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा निवडणूका लढत आहेत. त्यांसदर्भातील चर्चा झाली तर आम्ही चर्चा करू. यूपीएममध्ये जायाचं असल्याचं शिवेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. हिंद विचारांचे पक्ष एकत्र येतात. सत्ता स्थापन करतात आणि समाना कार्यक्रमावरती आम्ही सरकार चालवतो. एनडीए सुद्धा त्याच पद्धतीने चालत आहे. वाजपेयींच्या नेतृत्त्वाखाली आणि विचाराधारांखाली अनेक एनडीएचे पक्ष होते. त्यामध्ये राम मंदिरालाही विरोध करणारे पक्ष होते. तसेच एनडीए आणि यूपीएमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे पक्ष होते. राज्यात मिनी युपीएचाच प्रयोग सुरू आहे. असं संजय राऊत म्हणाले.

आम्ही महाराष्ट्रात काँग्रेससोबत आहोत आणि काँग्रेसही आमच्यासोबत

यूपीए विरोधी पक्षाची आघाडी आहे. ती अधिक मजबूतीने पुढे यायला पाहीजे. राजकीय पक्ष सुद्दा अधिकाधिक समोर यायला पाहीजे. समोर एक पर्याय उभा केला पाहीजे. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. आम्ही महाराष्ट्रात काँग्रेससोबत आहोत आणि काँग्रेसही आमच्यासोबत आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि संसंदेमध्ये एकत्र आहोत. त्याचप्रमाणे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये आम्ही एकत्र आहोत. लोकसभा आणि राज्यसभेत निर्णय घेताना आम्ही एकत्र मिळून घेतो. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आहोत.

- Advertisement -

गोव्यात तृणमूल, काँग्रेस व शिवसेना ?

गोव्यामध्ये लढण्यासाठी शिवसेना चाचपणी करत आहे. गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व तृणमूल काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन आघाडी स्थापन केली. त्यांची आघाडी स्थापन झालेली आहे. ज्याअर्थी शिवेसेना त्या आघाडीमध्ये नाही. त्याअर्थी शिवसेनेने त्या आघाडीत जाऊ नये. कारण गोव्यातील जनतेची मानसिकता आम्हाला माहितेय. तृणमूल काँग्रेसपेक्षा गोव्यात काय होईल हे शिवसेनेला अधिक माहिती आहे. महाराष्ट्र आणि गोव्याचं नातं हे सांस्कृतिक , भौगोलिक दृष्ट्या आहे. कलकत्त्यावरून गोव्यात आलेला पक्ष निवडणूक लढतोय ही चांगली गोष्ट आहे.

गोवा हा आमच्यासाठी एकदम जवळचा

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थिती गोव्यामध्ये काय आहे. हे आम्हाला माहिती आहे.त्यामुळे आम्ही गोव्यात स्वतंत्र लढू आणि लढताना शंभर वेळा विचार करू. तसेच त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. तसेच आदित्य ठाकरे हे गोव्यावर लक्ष ठेवून आहेत. तसेच गोवा हा आमच्यासाठी एकदम जवळचा आहे. त्यामुळे निवडणूक लढू शकतो. आम्ही गोव्यात निवडणूक लढलो आहे. परंतु आम्हाला यश मिळालं नव्हतं. त्यामुळे लढताना आम्ही लक्ष ठेवू. असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा: Omicron Variant : जगभरातील ४७ देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा धुमाकूळ, दक्षिण आफ्रिकेत रूग्णांचा आकडा ७०० पार


 

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -