घरमनोरंजनविक्की- कॅटरीनाने गुपचूप उरकला साखरपुडा?,सत्य आले समोर

विक्की- कॅटरीनाने गुपचूप उरकला साखरपुडा?,सत्य आले समोर

Subscribe

कॅटरीनाच्या टीमतर्फे एक अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आली आहे.

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या ब्रेकअप आणि पॅचअपच्या चर्चा दररोज रंगत असतात. नुकतच अभिनेता विक्की कौशल (vicky kaushal) आणि कॅटरीना कैफ (katrina kaif) यांची रोका सेरीमनी म्हणजेच गुपचूप साखरपूडा उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. मीडिया रिपोर्टनूसार दोघांनी नुकतच अधिकृतरित्या साखरपूडा केला आहे.असा दावा करण्यात आला होता. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. इंटरनेटवर विक्की आणि कॅटरीनावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. पण या बातमीमध्ये काहीच तथ्य नसल्याची माहती समोर येत आहे. (vicky kaushal,katrina kaif engagement)

कॅटरीना आणि विक्की यांनी समोर येऊन याबाबत काही स्पष्टीकरण दिले नसली तरीही कॅटरीनाच्या टीमतर्फे एक अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आली आहे. स्पोकस्परर्सने दिलेल्या माहितीनूसार दोघांचाही साखरपूडा झाला नाहीये. तसेच कॅटरीना लवकरच ‘टायगर 3’ च्या शूंटिगसाठी रवाना होणार आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल बयानी यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोद्वारे विक्की आणि कॅटरीनाचा साखरपूडा झाला असल्याची चूकीची पोस्ट शेअर करण्यात आली होती. यानंतर विरल बयानी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकांऊटवरुन ही पोस्ट डिलीट केली आहे.

- Advertisement -

अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट ‘शेरशाह’ प्रदर्शित होण्यापूर्वी पार्टी झाली होती. यामध्ये विक्की आणि कॅटरीना एकत्र दिसले होते. या दोघांसोबत कॅटरीनाची बहीण इसाबेल कैफ देखील होती. परंतु या पार्टी दरम्यान दोघं एकत्र फोटो काढण्यासाठी टाळाटाळ करत होते.

- Advertisement -

हे हि वाचा – भाईजानसोबतच्या दिग्गज अभिनेत्रीवर ओढावले आर्थिक संकट, केले मदतीचे आवाहन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -