घरमनोरंजनभाईजानसोबतच्या दिग्गज अभिनेत्रीवर ओढावले आर्थिक संकट, केले मदतीचे आवाहन

भाईजानसोबतच्या दिग्गज अभिनेत्रीवर ओढावले आर्थिक संकट, केले मदतीचे आवाहन

Subscribe

जोपर्यंत मी माझ्या पायावर उभी राहू शकत नाही तोवर मला आर्थिक मदतीची गरज भासणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांसमोर तर रोजी रोटीचा प्रश्न उभा राहीला आहे. यामध्ये फक्त सामान्य व्यक्तीच नाही तर अनेक कलाकार देखील भरडले जात आहे. नुकतच बॉलिवूडममधील दिग्गज अभिनेत्री सुनीता शिरोल (sunita shirole) यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्याची माहिती समोर येत आहे. सुनीता यांनी ‘बजरंगी भाईजान’ सारख्या हिट सिनेमात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (sunita shirole with salman khan) सोबत काम केलं आहे. सध्या त्यांना वयोवृद्धामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. तसेच आजारपणात उपचार करण्यातच खर्च झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती देखील अत्यंत खालावली आहे. आता त्यांनी लोकांकडे मदतीसाठी आवाहन केलं आहे. (sunita shirole appeals for financial help)

ई टाईम्सने दिलेल्या माहितीनूसार अभिनेत्री सुनीता शिरोल यांनी म्हटले आहे की, “देशात लॉकडाऊन जाहीर होईपर्यंत मी काम करत होते. भीषण महामारीच्या काळात देखील स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी धडपड करत आहे. तसेच या काळात माझ्या जवळ असलेली सर्व सेव्हिंग्स मी खर्च केली. दुर्भाग्याने माझी किडणी खराब झाल्याने तसेच गुडघे दुखीचा प्रचंड त्रास होऊ लागल्याने मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. इतकंच नाही तर मी रुग्णालायात दोनदा पडल्याने माझा उजवा पाय तूटला. आता मी माझा पाय हलवू किंवा दुमडूशकत नाही. माझी यापूर्वी एंजियोप्लास्टी करण्यात आली आहे. तसेच माझे वय झाल्याने मी इतर आजाराने देखील ग्रस्त आहे.”

- Advertisement -

सुनीता शिरोल पुढे म्हाणाल्या, ” मी एका फ्लॅटमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहते. तसेच तीन महिन्यापासून मी घराचे भाडे दिले नाहिये. नुपूर अलंकारला माझ्या मदतीसाठी पाठवल्याबद्दल मी सिनटाचे CINTAA (सिने अँन्ड टीवी आर्टिस्ट्स असोसिएशन) आभार मानते.जोपर्यंत मी माझ्या पायावर उभी राहू शकत नाही तोवर मला आर्थिक मदतीची गरज भासणार आहे

85 वर्षीय सुनीता शिरोल यांनी (Sunita Shirole) ‘शापित’, ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’, ‘बजरंगी भाईजान’ ‘मेड इन चाइना’ , ‘किस देश में है मेरा दिल’, ‘मिसेज कौशिक की पांच बहुएं’ सारख्या हिट सिनेमात काम केलं आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – SRKचा टीम ट्रिनबागो नाइट राइडर्सवरील ‘वी आर टीकेआर’ शॉर्टफिल्म प्रदर्शित

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -