घरमनोरंजनस्मृती इराणी यांचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून नेटकरी हैराण, "जुन्या स्मृतीबेन परतल्या''

स्मृती इराणी यांचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून नेटकरी हैराण, “जुन्या स्मृतीबेन परतल्या”

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील क्योंकी सास भी कभी बहु थी या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री स्मृती इराणी यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तुलसी विरानी या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. त्यामुळे खऱ्या आयुष्याचही अजूनही त्यांना तुलसी विरानी नावानेच सर्वाधिक ओळखले जाते. आज त्या राजकारणात सक्रिय असल्या तरीही त्या एक सुसंस्कृत सून आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सध्या मालिका विश्वापासून त्या दूर असल्या तरी राजकीय घडामोडींमधून त्या सतत चर्चेत असतात. सोशल मीडियावरही त्या अधिक सक्रिय असतात. मात्र स्मृती इराणी आता जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचा नवा लूक पाहून नेटकरी हैराण झालेत. यात त्यांचे वजन खूप कमी झाल्याचे दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

- Advertisement -

स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्स आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्या या फोटोंचे साऱ्यांनीच लक्ष वेधून घेतले. या फोटोंसह त्यांनी मास्क घालणे किती महत्वाचे असते हे पटवून सांगितले आहे. कॅप्शनमध्ये स्मृती इराणी यांनी लिहिले की, ”सोमवार मंत्र, कानातले घाला, नाकातील घाला किंवा नका नका घालू, पण मास्क घाला. कारण आत्ताही दोन हात अंतर आणि मास्क आवश्यक आहे. ”
हा फोटो पाहून, अभिनेत्री स्मृती इराणी यांनी वजन कमी केल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर एका युजर्सने कमेंट केली की, ‘जुन्या स्मृतीबेन परतल्या’ अशा केल्या आहेत. तर अनेकांनी स्मृती इराणी इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार का? असे प्रश्न विचारत उत्सुकता व्यक्त केली आहे.

वयाच्या २१ व्या वर्षी स्मृती इराणी यांनी फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांना इंग्रजी साहित्य आणि क्रिडा साहसांची आवड आहे. याशिवाय त्यांची राजकारणातील आवड लक्षात घेत केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळवले.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -