Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं'मध्ये विजया बाबर दिसणार बयोच्या भूमिकेत!

‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’मध्ये विजया बाबर दिसणार बयोच्या भूमिकेत!

Subscribe

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बायोचा शिक्षणासाठीच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो ह्या विषयावर आधारित असलेली ही मालिका आहे. आपल्या आईची साथ सुटल्यानंतर बयो आता वडिलांसोबत पुढची वाटचाल कशी करेल, हे मालिकेतून पाहता येईल. पण आता मालिका काही काळाचा अवधी घेऊन पुढे सरकणार आहे. बायो आता मोठी झालेली दिसणार आहे. ती आता मुंबईमध्ये दाखल झाली असून मुंबईतील विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकायला येणार आहे.

आता बयोच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर ही अभिनेत्री दिसणार आहे. आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेत असून छोटी बायो मोठी होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला सुद्धा वळण आलेले पाहायला मिळेल. बयो मुंबईमध्ये आल्यावर मुंबईच्या वेगाशी कसं जुळवून घेते, हे आता मालिकेतून पाहायला मिळेल. मुंबई- कोकणात राहणारी सर्वसामान्य मुलगी डॉक्टर होण्याचे स्वप्न मनी बाळगते आणि त्या दिशेने आपली वाटचाल करते. तिच्या या खडतर प्रवासात अनेक काटे येतात. पण त्यावरही मात करून ती पुढे जात असते. ही गोष्ट आहे सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेतील आहे.

- Advertisement -

बयोबरोबरचे इतर कलाकारही नवीन असणार आहेत. ईराच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरच ओजस मराठे हा अभिनेताही असणार आहे. आता मेडिकल कॉलेजमध्ये बयो कशा प्रकारे अभ्यास करेल आणि मुंबईत येऊन ती इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेईल आणि डॉक्टर व्हायचं तिचं स्वप्न कसं पूर्ण करेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मालिकेत आता मोठी झालेली बयो दिसणार आहे आणि आता बयोच्या आयुष्यातलं हे वळण तिला पुढे कसं मदत करेल, हे पाहायला मिळेल. कोकणातून आलेली बयो मुंबईमध्ये बागडताना दिसेल. आता तिच्या विश्वातून बाहेर येऊन ती आयुष्याच्या या वळणावर येणाऱ्या अडथळ्यांना कशा प्रकारे सामोरी जाईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. बयोचं डॉक्टर व्हायचं स्वप्न कसं पूर्ण होणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

 


हेही वाचा : विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू यांची बहारदार केमिस्ट्री

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -