घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर Sharad Pawar : भाजपा आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न; शरद...

Sharad Pawar : भाजपा आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न; शरद पवारांनी सांगितली रणनीती

Subscribe

Sharad Pawar : भाजपाची (BJP) भूमिका समाजविरोधी आणि फुट पाडणारी आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून भाजपा आणि मोदीं सरकार (Modi Government) विरोधात देशपातळीवर दोन सभा घेण्यात येतील. याबाबत 1 सप्टेंबरच्या सभेत पुढील रणनीती ठरवण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sharad Pawar Our attempt to create public opinion against BJP and Modi Sharad Pawar told the strategy)

शरद पवार म्हणाले की, गेल्या आठ-दहा दिवसांपासून मी महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या सांगोला परिसरात सुमारे 1000 लोकांनी माझी गाडी वेगवेगळ्या ठिकाणी अडवली. पुणे, सातारा आदी ठिकाणचे अनेक कार्यकर्ते मला भेटायला आले. मी उद्या बीडला सभा घेणार आहे. असे म्हणताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : भाजपा आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न; शरद पवारांनी सांगितली रणनीती

भाजपा आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न

शरद पवार म्हणाले की, भाजपाची भूमिका समाजविरोधी आणि फुट पाडणारी आहे. ‘इंडिया’ आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत भाजपा विरोधात लढण्यासाठी यशस्वी रणनीती बनवणार आहे. ‘इंडिया’ आघाडी देशपातळीवर दोन सभा घेणार असून याबाबत 1 सप्टेंबर रोजीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येईल. बिहार आणि कर्नाटकात दोन सभा घेण्यात येणार असून भाजपा आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – पवार मोठेच नेते, त्यांना कुणीही ऑफर देऊ शकतो; शरद पवारांबाबत कुणी म्हटले असे? वाचा-

भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

भाजपावर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले की, भाजपाला लोकांमध्ये तेढ निर्माण करायचा आहे. धर्म आणि समुदायाच्या आधारावर त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे. भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सरकार अस्थिर केले आहे.

- Advertisment -