घरमनोरंजनVikrant Massey : विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट'चा टीझर लाँच

Vikrant Massey : विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’चा टीझर लाँच

Subscribe

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीच्या ’12th Fail’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. प्रेक्षकांचा अनपेक्षित प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. विधू विनोद चोप्रा यांच्या या चित्रपटात विक्रांत मेस्सीने आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांची भूमिका निभावली. मनोज कुमार शर्मा यांच्या संघर्षावर हा चित्रपट बेतलेला होता. यासाठी विक्रांतला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आपली जादू दाखवण्यास विक्रांत सज्ज झाला आहे. विक्रांत एका वेगळाच विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात विक्रांत मेस्सी झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाची झलक दाखवणारा एक छोटासा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हा चित्रपट ‘गोध्रा रेल्वे जळीतकांड’ प्रकरणावर आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये विक्रांत न्यूज अँकरच्या अर्थात वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत दिसत आहे. यावेळी रेकोर्डिंग करत असल्याचे दृष्य आहे. त्याच्या टेलिप्रॉम्पटरवर ‘गोध्रा अपघातामध्ये.. ‘अशी ओळ येते. त्याला तोडत वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत असलेला विक्रांत मेस्सी हा गोध्रा येथील घटना अपघात नव्हती असे म्हणताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

- Advertisement -

 हा टीझर शेअर करताना विक्रांतने लिहिलं, “22 वर्षांपूर्वी गोधरा रेल्वेस्थानकात जळणाऱ्या रेल्वेमध्ये 59 लोकांनी त्यांचे प्राण गमावले. त्या सगळ्यांना आज आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. याबरोबरच ‘द साबरमती रिपोर्ट’चा टीझरही शेअर करत आहे जो 3 मे 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.”

‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाची कथा ही गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी साबरमती एक्सप्रेस जाळण्यात आली होती. या घटनेचे गुजरात आणि देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाले.

- Advertisement -

चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंडेल यांनी केले आहे. चित्रपटात विक्रांत मेस्सीसोबत राशी खन्ना, रिद्धी डोग्रा आदींच्या भूमिका आहेत. एकता कपूर, शोभा कपूर, अमूल मोहन आदींनी निर्मिती केली आहे.3 मे 2024 रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना हा टीझर पसंत पडला असून यासाठी ते प्रचंड उत्सुक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -