घरमहाराष्ट्रChhatrapati Sambhajinagar : आता छत्रपती संभाजीनगरमधूनच थेट गाठा बँकॉक आणि सिंगापूर

Chhatrapati Sambhajinagar : आता छत्रपती संभाजीनगरमधूनच थेट गाठा बँकॉक आणि सिंगापूर

Subscribe

सध्या छत्रपती संभाजीनगरातील विमानतळावरून एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची एअर सर्व्हिस सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी बँकॉक आणि सिंगापूरला जाण्यासाठी मुंबईला येण्याची गरज नाही. आता थेट संभाजीनगरच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बँकॉक आणि सिंगापूरला जाता येणार आहे. मलेशिया एअर एशिया या विमान कंपनीच्या पुढाकाराने भारतातील 14 शहरांना मलेशियाची राजधानी क्वालालांपुर, बँकॉक आणि सिंगापूर या शहारांशी जोडणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर हे त्यापैकी एक शहर आहे. यामुळे संभाजीनगर वासियांसाठी आनंदाची बातमी आहे.

यानंतर संभाजीनगर शहराची एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा निर्णय फायदेशीर होणार आहे. त्यामुळे संभाजीनगर वासियांना बँकॉक आणि सिंगापूरला जाण्यासाठी दुसऱ्या शहरात जाऊन उड्डाणाची वाट पाहावी लागणार नाही. आता थेट संभाजीनगर येथूनच बँकॉक आणि सिंगापूरला उड्डाण भरता येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Narendra Modi : सारा खेळ खुर्चीचा; सभा मोदींची आणि खुर्च्यांवर फोटो राहुल गांधींचे, काय आहे प्रकार ?

गेल्या अनेक वर्षापासून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्राधिकरणाकडून थायलंड आणि औरंगाबाद येथून बँकॉकसह अन्य आशियायी देशांना जाण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यातआला होता. आता मलेशिया एअर एशिया या विमान कंपनीच्या पुढाकाराने संभाजीनगर शहरशी जोडले आहे. यामुळे यामुळे मलेशियाचा पर्यटन आणि उद्योग या दोन्ही क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बँकॉक आणि सिंगापूर विमानसेवा सुरू होणार आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी आनंदाची बातमी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “मोदींची गॅरंटी” कधीही पूर्ण न होणारी; ‘चाय पे चर्चेचा’ संदर्भ देत वडेट्टीवारांची टीका

सध्या छत्रपती संभाजीनगरातील विमानतळावरून एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची एअर सर्व्हिस सुरू आहे. या विमान सेवेमुळे छत्रपती संभाजीनगर शहर येथून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि तिरुपतीला जाण्यासाठी विमान सेवा सुरू आहेत. आता या विमानसेवा वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -