घरमनोरंजनविवेक अग्निहोत्रींनी दिला फिल्मफेअर अवॉर्ड्स घेण्यास नकार

विवेक अग्निहोत्रींनी दिला फिल्मफेअर अवॉर्ड्स घेण्यास नकार

Subscribe

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मिर फाईल्स’ आजही चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील कथेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचे अनेकांनी कौतुकही केले. अशातच, 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्मध्ये 7 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. मात्र, समोर आलेल्या बातमीनुसार या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हे अवॉर्ड्स घेण्यास नकार दिला आहे.

विवेक अग्निहोत्रींनी दिला अवॉर्ड्स घेण्यास नकार

विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाला 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्मध्ये 7 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले. मात्र, त्यांनी हे अवॉर्ड्स घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी हे पुरस्कार स्वीकारण्यास नकार देण्याचे कारण आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिलंय की, “मला मीडियावरून कळले आहे की, काश्मिर फाईल्सला 7 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. पण हे अनैतिक आणि चित्रपटविरोधी पुरस्कार मी नम्रपणे नाकारतो. याचे कारणही मी सांगतो.”

- Advertisement -

त्यांनी पुढे लिहिलंय की, “फिल्मफेअरच्या मते, कलाकाराशिवाय कोणाचाही चेहरा नाही. कोणी आहे की नाही हे महत्त्वाचे नाही. फिल्मफेअरच्या अनैतिक जगात संजय लीला भन्साळी आणि सूरज बडजात्या सारख्या प्रमुख एकही दिग्दर्शकांचा चेहरा नाही. भन्साळीची ओळख आलिया भट्टसोबत, सूरजची अमिताभसोबत आणि अनीस बज्मीची कार्तिक आर्यनसोबत ओळख आहे. फिल्मफेअर पुरस्काराने चित्रपट निर्मात्याचा सन्मान वाढतो असे नाही, पण ही लाजिवाणी व्यवस्था संपली पाहिजे. त्यामुळे मी बॉलिवूडच्या भ्रष्ट, अनैतिक पुरस्कारांना नाकारतो. असा कोणताच पुरस्कार मी घेणार नाही.” असं विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

दाक्षिणात्य अभिनेत्री Samantha चे जबरा फॅनने बनवलेय मंदिर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -