घरमनोरंजनअरबाज-मलायका 'या' शोसाठी येणार एकत्र?

अरबाज-मलायका ‘या’ शोसाठी येणार एकत्र?

Subscribe

अरबाजने या ऑफर करिता होकार दिला असून मलायकाला निर्णय घेण्यासाठी काही दिवसाचा अवधी मागितला आहे. त्यामुळे मलायका कोणासोबत हे पर्व जज करणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. 

अरबाज खान आणि मलायका अरोरा कायद्याने वेगळे होऊन बरेच दिवस झाले आहे. दोघेही  त्यांच्या स्वतंत्र आयुष्यात वेगळ्या वळणावर आहे. एका विदेशी तरूणीच्या प्रेमात अरबाज खान आहे तर, मलायका अरोरा देखील अर्जून कपूरच्या प्रेमात असल्याची चर्चा बॉलिवूड विश्वात जोरदार रंगतांना दिसत आहे. लवकरच अरबाज खान आणि मलायका अरोरा एका टेलिव्हिजन शोसाठी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. डीएनडी या वृत्तसमुहाने दिलेल्या वृत्तानुसार, अरबाज खान आणि मलायका अरोरा टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘नच बलिए’ साठी जजेसच्या भूमिकेत दिसू शकतात.

यंदाच्या पर्वामध्ये नवा ट्विस्ट

यापूर्वीच्या  ‘नच बलिए’ पर्वामध्ये टेलिव्हिजन मधील सुप्रसिद्ध जोड्या तसेच विवाहित जोड्या दिसल्या होत्या. परंतु, यंदाच्या पर्वामध्ये नवा ट्विस्ट देत ब्रेकअप झालेल्या जोड्या, शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक आपल्या एक्स गर्लफ्रेन्ड वा एक्स बॉयफ्रेन्डसोबत ‘नच बलिए’च्या मंचावर सादरीकरण करतांना दिसतील.  त्यामुळे, या पर्वाचे अरबाज व मलायका या एक्स-कपलने जज करावे, अशी निर्मात्यांची देखील इच्छा आहे.

- Advertisement -

मलायकाचा अद्याप होकार नाही

‘नच बलिए’च्या गेल्या सीझनमध्ये दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया, आश्का गोराडिया-ब्रेंट गोबल, सनाया इराणी-मोहित सहगल, भारती सिंग-हर्ष लिम्बाचिया, दीपिका कक्कर-शोएब इब्राहिम सारख्या सेलिब्रिटी जोड्या थिरकल्या असून प्रचंड धूम केली होती. मागच्या ‘नच बलिए’पर्वामध्ये दिव्यांका व विवेक ही विजेती जोडी ठरली होती. अरबाजने या ऑफर करिता होकार दिला असून मलायकाला निर्णय घेण्यासाठी काही दिवसाचा अवधी मागितला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -