घरदेश-विदेशआता भारताला 'पाक'सोबत खेळावेच लागेल!

आता भारताला ‘पाक’सोबत खेळावेच लागेल!

Subscribe

दहशतवाद्यांना शरण देणाऱ्या देशांसोबत संबंध तोडण्याच्या विनंतीला बीसीसीआयने केलेल्या विनंतीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फेटाळले आहे. तसेच आयसीसीने या प्रकरणात कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत भारताला पाकिस्तान संघासोबत खेळावेच लागणार आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये ‘सीआरपीएफ’चे ४० हून अधिक जवान शहीद झाले. भारतामधील प्रत्येक नागरिकांच्या मनात हल्ल्याविषयी तीव्र राग आहे. या रागातूनच बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहिले होते. त्यापत्रात बीसीसीआयने विश्व संस्था आणि त्यांच्यासोबत संलग्न असलेल्या देशांना दहशतवाद्यांना शरण देणाऱ्या देशांसोबत संबंध तोडण्याची विनंती केले होती. मात्र, बीसीसीआयने केलेल्या विनंतीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांची विनंती फेटाळताना ‘आयसीसीची या प्रकरणात कोणतीही भूमिका नसल्याचे’ स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत भारताला पाकिस्तानसोबत खेळावे लागणार आहे.

पाकिस्तानाचा कुठेही उल्लेख नाही

कुठल्याही देशासोबतचे संबंध तोडण्याचा निर्णय सरकारच्या पातळीवर व्हायला हवा आणि आयसीसीमध्ये असा कुठलाही नियम नाही. याबद्दल बीसीसीआयलाही कल्पना आहे. पण तरी बीसीसीआयने प्रयत्न केला, असे आयसीसीच्या चेअरमन शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी चेअरमन शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीमध्ये एक मुद्दा उपस्थित करण्यात आला की, बीसीसीआयने दहशतवाद्यांना शरण देण्याऱ्या देशांवर बहिष्कार टाका अशी विनंती केली होती, मात्र त्या पत्रामध्ये पाकिस्तानचा कुठही उल्लेख नव्हता. हा मुद्दा उचलला पण त्यावर फार वेळ चर्चा झाली नाही. या बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी करीत होते.

- Advertisement -

१६ जूनला भारत – पाक स्पर्धा

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना शरण देणाऱ्या देशांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटचे संचालन करीत असलेल्या प्रशासकांच्या समितीने यासंबंधीत अजून कुठला निर्णय घेतलेला नाही आहे. तसेच त्यावर सरकारचे काय मत आहे, याची प्रतीक्षा करीत आहेत. ७ मार्च रोजी बीसीसीआयने बैठक घेतली आहे त्यात काही तोडगा निघाला नाही, तर भारतीय क्रिकेट संघाला आगामी विश्वकप स्पर्धेमध्ये १६ जून रोजी पाकिस्तानी संघासोबत  खेळावेच लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -